सूनेच्या दबावात एकनाथ खडसे? गंभीर आरोप, मोठी खळबळ, काँग्रेसने थेट…
काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी निवडणुकीची सुरू असून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. काही ठिकाणी आघाडी आणि महायुती बघायला मिळतंय तर काही भागात स्वतंत्र निवडणुका लढवल्या जात आहेत. यादरम्यानच मुक्ताईनगर येथे खडसेंच्या भूमिकेने खळबळ उडाली असून भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा काँग्रेसने त्यांच्यावर गंभीर आरोप केला. एकनाथ खडसे हे त्यांच्या सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप आहे. चित्रपटाप्रमाणे मुक्ताईनगर नगरपंचायतीचे राजकारण पहायला मिळत आहे. एकेकाळी मुक्ताईनगर खडसेंचा बालेकिल्ला असताना आता आमच्याकडे उमेदवार नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढू शकत नाही, आमच्याकडे पैसे नाहीत असं म्हणण्याची वेळ एकनाथ खडसे यांच्यावर आली आहे.
एकनाथ खडसेंनी भाजपला छुपा पाठिंबा देण्यासाठी ऐन वेळी अशी भूमिका घेतल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे जगदीश पाटील यांनी केला आहे. एकनाथ खडसे हे त्यांच्या सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांची दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगर मध्ये बैठक पार पडली असून यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात रावेर लोकसभामधील सर्व नगरपालिकेची निवडणूक लढवायची अशी चर्चा बैठकीत झाली.
त्यानंतर, एकनाथ खडसे यांनी शेवटच्या दिवशी आमच्याकडे उमेदवार नसल्याने आम्ही मुक्ताईनगर नगरपंचायत लढू शकत नाही, निवडणुकीला पैसा लागतो तो आमच्याकडे नाही असे सांगितल्याने महाविकास आघाडीमधील नेत्यांना अचानक धक्का बसला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते डॉ. जगदीश पाटील यांनी एकनाथ खडसे यांना खडेबोल सुनावत ते आपल्या सुनबाईंच्या दबावात काम करत असल्याचा आरोप केला.
भाजपला छुपा पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतला का असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे मुक्ताईनगर सह इतर ठिकाणी महाविकास आघाडीच्या इतर पक्षांवर एकनाथ खडसेंच्या या निर्णयाचा मोठा परिणाम होणार असून आगामी निवडणुकांमध्ये याचा फटका महाविकास आघाडीला बसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, होणाऱ्या आरोपांवर एकनाथ खडसे यांनी बोलणे टाळले.
