AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसची डोकेदुखी वाढली, आता धुळ्यात दुफळी; जिल्ह्याध्यक्षांसह पदाधिकाऱ्याचे राजीनामे

धुळ्यात लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे टेन्शन वाढलं आहे. काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या सुभाष भामरे यांच्या विरोधात त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. पण त्यांना पक्षाअंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. धुळे मतदारसंघात काय घडतंय वाचा.

काँग्रेसची डोकेदुखी वाढली, आता धुळ्यात दुफळी; जिल्ह्याध्यक्षांसह पदाधिकाऱ्याचे राजीनामे
| Updated on: Apr 11, 2024 | 9:04 PM
Share

Dhule Loksabha : धुळे लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवारीनं दुफळी माजलीय आहे. डॉ. शोभा बच्छावा यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. नाराज पदाधिकाऱ्यांच्या समजुतीसाठी उमेदवार शोभा बच्छाव काँग्रेस कार्यालयात पोहोचल्या होत्या., मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घोषणांमुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. काँग्रेसकडून यंदा डॉ. तुषार शेवाळे आणि शाम सनेर इच्छूक होते. भाजपकडून सुभाष भामरे यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेसनं उमेदवार देण्यास महिनाभर उशीर केला. त्यात आयात उमेदवार दिल्यानं काँग्रेसमधली नाराजी उफाळून आलीये.

कोण आहेत शोभा बच्छाव?

डॉ. शोभा बच्छाव मूळ मालेगावच्या आहेत. त्यांचे आजोळ धुळ्यामधील आहेत. नामांकित डॉक्टर आणि 35 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. दोन टर्म नाशिक विधानसभेतून आमदार राहिल्या आहेत. 2009 मध्ये काँग्रेस काळात मंत्री आणि 2002 साली नाशिकच्या महापौरही राहिल्या आहेत.

धुळे लोकसभेत शिंदखेडा, बागलाण, धुळे ग्रामीण, धुळे शहर, मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य., अशा सहा विधानसभा आहेत. 2019 ला भाजपच्या सुभाष भामरे यांच्याविरोधात काँग्रेसचे कुणाल पाटील लढले होते. भामरेंना 6 लाख 13 हजार 533 मतं पडली., तर कुणाल पाटलांना 3 लाख 84 हजार 290 मतदान झालं होतं. भाजपचे सुभाष भामरे सव्वा २ लाखांहून जास्तीच्या मतांनी जिंकून आले होते. धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव बाह्य आणि बागलाण या ५ विधानसभांमध्ये भाजपच्या सुभाष भामरे यांना लीड होतं. तर मालेगाव मध्यमधून काँग्रेसचे कुणाल पाटील आघाडीवर राहिले.

काँग्रेस उमेदवार बदलणार?

धुळे लोकसभेत धुळे जिल्ह्यातील ३ आणि नाशिक जि्ह्यातील ३ विधानसभा येतात. त्यामुळे धुळ्याची लेक आणि नाशिकची सून या समीकरणानं काँग्रेसनं शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. मात्र वर्षानुवर्षे जमिनीवर काम करणाऱ्या समर्थकांचं काय, असा प्रश्न नाराज पदाधिकारी करत आहेत. शोभा बच्छाव यांचं काम न करण्याचा इशाही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे राजीनामासत्रानं काँग्रेस उमेदवार बदलणार की मग शोभा बच्छाव यांची उमेदवारी कायम राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.