शिवसेनेच्या ‘त्या’ चुकीमुळे महाराष्ट्रावर मोठं संकट, आता तरी…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा नवा सल्ला काय?

मराठी माणसाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रावर संकट आल्याचं दलवाई यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या त्या चुकीमुळे महाराष्ट्रावर मोठं संकट, आता तरी...; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा नवा सल्ला काय?
| Updated on: Jan 17, 2025 | 7:26 PM

मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्विकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक आहे, असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे. मराठीचा मुद्दा सोडून शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं आणि RSS ला मदत केली. शिवसेनेच्या त्या चुकीमुळे मुंबईचं गुजरातीकरण होतं आहे, असं दलवाई यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले दलवाई? 

मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्विकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक आहे, मराठीचा मुद्दा सोडून शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं आणि RSS ला मदत केली. शिवसेनेच्या त्या चुकीमुळे मुंबईचं गुजरातीकरण होतं आहे, शिवसेनेनं मराठीचा मुद्दा आता पुन्हा हातात घ्यावा, असं दलवाई यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रावर हे संकट आलं आहे, मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतोय, असंही यावेळी दलवाई यांनी म्हटलं आहे. दलवाई यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा सुरुवातीला शिवसेनेकडून महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेनं आपली भूमिका बदलत हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतला. याच एका मुद्द्यावर भाजपसोबत युती केली. त्यानंतर राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत देखील आली. दरम्यान याच मुद्द्यावरून आता हुसेन दलवाई यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान त्यानंतर सत्तेत असतानाच भाजप आणि शिवसेनेमध्ये देखील खटके उडाले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. भाजपला सत्तेच्या बाहेर बसावं लागलं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि युतीचं सरकार सत्तेत आलं. शिवसेनेत मोठी फूट पडली, शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट असे दोन गट पडले आता हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा मराठी लोकांचा मुद्दा हाती घेण्याचा सल्ला दिला आहे.