AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चर्चा शिवसेना प्रवेशाची, पण रवींद्र धंगेकरांना आता या बड्या पक्षाकडून थेट ऑफर!

रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे, मात्र त्यातच आता त्यांना आणखी एका पक्षाकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे.

चर्चा शिवसेना प्रवेशाची, पण रवींद्र धंगेकरांना आता या बड्या पक्षाकडून थेट ऑफर!
| Updated on: Feb 24, 2025 | 9:04 PM
Share

काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, मात्र त्यांनी या चर्चेचं खंडण करत ही शक्यता फेटाळून लावली आहे. असं असतानाच त्यांना आता आणखी एका पक्षाकडून पक्षात येण्याची खुली ऑफर देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या रुपाली पाटील?  

रवी भाऊ आपण हाडाचे कार्यकर्ते, सक्षम लोकप्रतिनिधी आहात.  निवडणुकीत हार जीत चालतच असते. पण नेतृत्व, कामाची पद्धत थांबत नसते. भाऊ तुमच्या सोबत काम केले आहेच. काही दिवसांपासून बातमी येत आहे, दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहात.   कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहात, कुठे प्रवेश करायचा या संदर्भात चर्चा विनिमय करणार आहात. रवी भाऊ अजित दादांचे आणि तुमचे संबंध नेहमीच चांगले आहे, ते तुम्ही अनुभवले आहे. तुमच्यासारखा काम करणारा, सक्षम, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्याने, लोकप्रतिनिधीने नक्की एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी  कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती करते, बाकी पक्ष वेगळे असले तरी हाडाचे कार्यकर्ते, काम करणारे सक्षम लोकप्रतिनिधी बहीण भाऊ हे नाते कायम आहेच. असं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी कामानिमित्त अजित पवार यांना भेटून आल्याची माहिती स्वत: रवीद्र धंगेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असताना आता रवींद्र धंगेकर यांना राष्ट्रवादीने सुद्धा खुली ऑफर दिली आहे, यामुळे आता रवींद्र धंगेकर नक्की काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. रवींद्र धंगेकर उद्या किंवा परवा आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन राजकारणाची पुढील दिशा ठरवणार आहेत, त्यापूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना ऑफर दिली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी