भरधाव कंटनेरची स्कूटीला धडक, आजोबांसोबत फिरायला गेलेल्या नातीचा दुर्देवी मृत्यू

कंटनेरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका दहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Ten Years Girl died Accident in Beed)

भरधाव कंटनेरची स्कूटीला धडक, आजोबांसोबत फिरायला गेलेल्या नातीचा दुर्देवी मृत्यू

बीड : भरधाव वेगातील कंटनेरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका दहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किमया अमर देशमुख असे या मुलीचे नाव आहे. या अपघातात तिचे आजोबा गंभीररित्या जखमी झाले आहे. बीडमधील बार्शी रोडवर हा अपघात झाला आहे. (Ten Years Girl died Accident in Beed)

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11.30 च्या सुमारास बीड शहरातील बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनासमोर हा अपघात घडला. किमया अमर देशमुख (10) असे एका चिमुरडीचे नाव आहे. किमया तिच्या आजोबांसोबत स्कूटीवरुन फिरण्यासाठी निघाली होती. त्यावेळी हे दोघेही हायवेवर स्कूटीवरुन जात होते. त्यावेळी भरधाव वेगातील कंटेनरने त्यांच्या स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात किमयाचा जागीच मृत्यू झाला.  तर तिचे आजोबा गंभीर जखमी झाले आहेत.

यानंतर त्यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर किमयाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. या अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Ten Years Girl died Accident in Beed)

संबंधित बातम्या : 

तब्बल 1800 किलो गांजा जप्त, ड्रग्ज तस्करीचा छडा लागण्याची शक्यता

मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?

धक्कादायक… व्यसनीपणाला कंटाळून आई आणि मुलानेच दिली बापाच्या खुनाची सुपारी


Published On - 9:43 pm, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI