Maharashtra Coronavirus LIVE Update : पुणे जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांवर सध्या 32 हजार रुग्णांवर उपचार

| Updated on: May 30, 2021 | 12:39 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुणे जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांवर सध्या 32 हजार रुग्णांवर उपचार
corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 May 2021 09:15 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांवर सध्या 32 हजार रुग्णांवर उपचार

    पुणे – पुणे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आणि पॉझिटिव्हीटी रेट कमी होताना दिसत आहे. एप्रिलचा तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच 34 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता. आता हा दर 10 टक्क्यांवर आला आहे.

    -1 लाख 3 हजार रुग्ण जिल्ह्यात सक्रिय होते .आज तीच संख्या 32 हजारांवर वर आली आहे.

    -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिका तसेच ग्रामीण भागत विशेषतः चिल्ड्रन कोविड सेंटर उभारणार आहोत. तसेच औषधे उपकरणे याचीदेखील जुळवाजुळव सुरू करण्यात आलेले आहे.

    -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनचा मोठा तुटवडा जाणवत होता. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये 49 ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभे केले जातील. त्यापैकी दहा प्लान्ट हे कार्यान्वित झालेले आहेत.

    -कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागलेले आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात 520 रुग्ण हे म्युकरमायकोसिसवर उपचार घेत आहेत. त्यापैकी काही जणांची शस्त्रक्रिया झालेले आहे. महापालिका आणि ग्रामीण भागात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची शोधमोहीम सुरू आहे.

  • 29 May 2021 09:00 PM (IST)

    साताऱ्यात दिवसभरात 2257 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह

    सातारा कोरोना अपडेट

    आज सातारा जिल्ह्यात  2257 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह

    दिवसभरात 24 बाधितांचा मृत्यू

    दिवसभरात 2398 नागरिकांना दिला डिस्चार्ज

    आज अखेर सातारा कोरोनारुग्णांची आकडेवारी

    एकूण नमुने – 761815

    एकूण बाधित  रुग्ण– 162734

    घरी सोडण्यात आलेल्या व्यक्ती – 137441

    एकूण मृत्यू -3616

    सध्या एकूण 21651 रुग्णांवर उपचार सुरु

    सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती

  • 29 May 2021 08:34 PM (IST)

    मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 48 नवे कोरोना रूग्ण

    मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 48 कोरोना रूग्ण

    मुंबईत आज 25 जणांचा कोरोनाने मृत्यू

    मुंबईत आज 1 हजार 359 रुग्ण कोरोनामुक्त

  • 29 May 2021 07:31 PM (IST)

    जळगाव महापालिकेचे 5 भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर

    जळगाव :  महापालिकेचे 5 भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा चर्चेला दुजोरा, 5 नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला असून, हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची गुलाबराव पाटील यांची माहिती

    यापूर्वी भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे

  • 29 May 2021 07:28 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 858 नवे कोरोनाबाधित

    नाशिक :

    आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 2302

    आज पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ - 858

    नाशिक मनपा- 341 नाशिक ग्रामीण- 475 मालेगाव मनपा- 22 जिल्हा बाह्य- 20

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 4637

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -48 नाशिक मनपा- 17 मालेगाव मनपा- 08 नाशिक ग्रामीण- 23 जिल्हा बाह्य- 00

  • 29 May 2021 06:18 PM (IST)

    नागपूर जिल्ह्याला पुन्हा दिलासा, 24 तासांत 392 नव्या रुग्णांची नोंद

    - नागपूर जिल्ह्याला पुन्हा दिलासा, २४ तासांत ३९२ रुग्णांची नोंद

    - नागपूर शहरात २२४ तर ग्रामीण भागात १४६ रुग्ण

    - जिल्हयात गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू

    - २४ तासांत ९९३ रुग्ण झाले कोरोनामुक्त

    - जिल्ह्यात सध्या ७४७८ सक्रिय रुग्ण

  • 29 May 2021 05:48 PM (IST)

    उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत लसीकरण मोहिम

    मुंबई महापालिकेचा निर्णय

    उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या १८-४४ वयोगटातील विद्यार्थ्यांना, वैध कागदपत्र सादर केल्यास, कस्तुरबा, राजावाडी, कुपर या लसीकरण केंद्रांमध्ये लस देण्यात येईल.

    सोम-मंगळ-बुधवारी लाभार्थी येथे थेट जाऊ शकतात.

  • 29 May 2021 05:46 PM (IST)

    दिलासादायक ! वाशिममधील कोरोना रुग्णसंख्या घटली, दिवसभरात 153 नवे बाधित

    वाशिम कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात मागील दीड महिन्यातील एका दिवशी आढळलेला सर्वात कमी नव्या कोरोना रुग्णांचा आकडा

    जिल्ह्यात आज नवे 153 रुग्ण मुंबई महापालिकेचा निर्णय

    तर आज 406  जणांना डिस्चार्ज देण्यात आला

    तसेच 04 रुग्णांचा मृत्यू झाला

    जिल्ह्यात 15 मे नंतर मागील 15 दिवसात 99 रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे 5151 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 7121 रुग्ण कोरोनामुक्त झालेत

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 39841

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 2455

    आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 36930

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 455

  • 29 May 2021 04:38 PM (IST)

    परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पु्ण्यात लसीकरण मोहीम 

    पुणे : पुण्यातील परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची लसीकरण मोहीम

    दर आठवड्याच्या मंगळवारी आणि बूधवारी होणार लसीकरण

    कमला नेहरू रुग्णालयात होणार विशेष लसीकरण मोहीम

    विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची गरज नाही, वॉक इन पद्धतीने होणार लसीकरण

    मात्र परदेशातील शिक्षणाचा पुरावा लागणार महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

    परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार फायदा

  • 29 May 2021 04:23 PM (IST)

    भंडारा ऑक्सिजन बेड / आयसोलेशन बेड/ऑक्सीजन उपलब्धतेची माहिती

    भंडारा ऑक्सिजन बेड / आयसोलेशन बेड/ऑक्सीजन उपलब्धतेची माहिती

    बेड शिल्लक : आयसीयुचे बेड-- 139 रिकामे आयोसोलेशन बेड--793 रिकामे ऑक्सिजनचे बेड 268 रिकामे

    भंडारी जिल्ह्यात दिड महिण्यापुर्वी जिल्ह्यात आयसीयु व आँक्सिजन बेड सुध्दा मिळत नव्हते. दिड महिण्यापुर्वी कोवीड रुग्णांना बेडस मिळवण्यासाठी तारेवरची कसरत कराव लागायची.

  • 29 May 2021 03:20 PM (IST)

    नंदुरबार जिलह्यात 60 व्हेंटिलेटरयुक्त बेड रिकामे

    नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, सर्वसाधारण बेडबाबत माहिती

    सर्वसाधारण बेड

    जिल्ह्यात सर्वसाधारण बेड- 1272

    सद्यस्थितीला सर्वसाधारण रिक्त बेड - 1066

    व्हेंटिलेटर बेड

    जिल्ह्यात व्हेंटिलेटर बेड-  162

    सद्यस्थितीला रिक्त व्हेंटिलेटर बेड - 60

    सध्या व्हेंटिलेटर बेडवर उपचार घेणारे रुग्ण - 102

    ऑक्सिजन बेड

    जिल्ह्यात ऑक्सिजन बेड-  574

    सद्यस्थितीला रिक्त ऑक्सिजन बेड - 512

    ऑक्सिजन बेडवर उपचार  62 रुग्णांवर उपचार

  • 29 May 2021 03:02 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यातील बेड उपलब्धतेची माहिती

    उस्मानाबाद जिल्ह्यातील बेड उपलब्धतेची माहिती

    नॉर्मल बेड - 4 हजार 584 त्यापैकी 3 हजार 119 उपलब्ध

    आयसीयुचे बेड-- 263 पैकी 83 रिकामे

    व्हेंटिलेटर बेड - 143 पैकी 30 रिकामे

    ऑक्सिजन बेड - 965 पैकी 350 रिकामे

  • 29 May 2021 03:00 PM (IST)

    वर्धा जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड / व्हेंटिलेटर बेड / साधे बेड उपलब्धतेची माहिती

    वर्धा :

    ऑक्सिजन बेड / व्हेंटिलेटर बेड / साधे बेड उपलब्धतेची माहिती :

    जिल्ह्यात रुग्णालयात एकूण बेड क्षमता- 1230

    सध्या स्थितीत - 908 बेड रिक्त

    रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - 322

    - व्हेंटिलेटर बेड - एकूण 92 बेड यापैकी 73 रुग्ण रुग्ण उपचार घेत आहे 19 व्हेंटिलेटर बेड रिक्त आहे

    - ऑक्सिजन बेड - एकूण 970 बेड यापैकी 195 रुग्ण उपचार घेत आहे 775 ऑक्सिजन बेड रिक्त आहे

    - साधे बेड रुग्णालयात - एकूण 110 बेड यापैकी सर्व बेड खाली आहे

  • 29 May 2021 10:07 AM (IST)

    बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक

    बारामती :

    - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक

    - बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान सभागृहात बैठक

    - अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होतेय बैठक

    - बारामतीतील कोरोना परिस्थितीबद्दल अजित पवार घेणार आढावा

  • 29 May 2021 09:33 AM (IST)

    देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 73 हजार रुग्ण, 2,84,601 जणांना डिस्चार्ज

    गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1 लाख 73 हजार रुग्ण

    गेल्या 24 तासात 2 लाख 84 हजार 601 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    देशात 22 लाख 28 हजार 724 जणांवर सध्या उपचार सुरु

    गेल्या 15 दिवसात बाधीत पेक्षा डिस्चार्ज आकडा मोठा

  • 29 May 2021 09:32 AM (IST)

    औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचे 53 बळी

    औरंगाबाद -

    औरंगाबाद म्युकरमायकोसिसचे 53 बळी..

    म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांची संख्या 576 वर..

    अनेक रुग्णालयांनी लपवली होती म्युकरमायकोसिसची खरी रुग्णसंख्या..

    मृत्यूचे आणि म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण पाहता आरोग्य विभागाला मोठा धक्का...

    म्युकरमायकोसिसची आणखी रुग्णसंख्या समोर येण्याची शक्यता

  • 29 May 2021 09:28 AM (IST)

    वर्धा जिल्ह्यात आता आरोग्य केंद्रातही होणार आता 'आरटीपीसीआर'

    वर्धा

    - जिल्ह्यात आता आरोग्य केंद्रातही होणार आता 'आरटीपीसीआर'

    - दररोज ५० स्टॅब कलेक्शनचे नियोजन

    - जिल्ह्यात २८ प्राथमिक आरोग्य केंद्र असून २७ केंद्रावर आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था

    - पूर्वी सामान्य रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालय आणि सावंगी , सेवाग्राम रुग्णालयातच होत होती आरटीपीसीआर चाचणी

    - ग्रामीण भागातील रुग्णांचे निदान व्हावे म्हणून निर्णय

    - या सर्व ठिकाणी मोफत होणार चाचणी

  • 29 May 2021 09:28 AM (IST)

    वर्धा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत 62 रुग्ण

    वर्धा

    - जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत ६२ रुग्ण

    - म्युकरमायकोसिसमुळे एकही रुग्णाचा मृत्यू नाही

    - सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात सुरू आहे रुग्णांवर उपचार

    -६२ रुग्ण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाले होते. यातील १२ जणांना पूर्णतः बरे झाल्यानंतर सुटी देण्यात आली आहे.

    - रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयांकडून औषधांचा पुरवठा

  • 29 May 2021 09:26 AM (IST)

    पियाजिओ कंपनीच्या वतीने बारामतीसाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर

    बारामती :

    पियाजिओ कंपनीच्या वतीने बारामतीसाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर...

    - बारामतीसाठी दहा, तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सात कॉन्सनट्रेटर...

    - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कॉन्सनट्रेटर प्रदान

  • 29 May 2021 08:05 AM (IST)

    औरंगाबादेत विनामास्क असल्याने आडवल्यामुळे पोलिसांना धक्काबुक्की

    औरंगाबाद -

    पोलिसांनी विनामास्क असल्याने आडवल्यामुळे पोलिसांना धक्काबुक्की..

    दोन महिला आणि जमावाने पोलिसांना शिवीगाळ करत केली धक्काबुक्की...

    पोलिसांच्या अंगावर धावून जात दिल्या मारण्याच्या धमक्या..

    बॅरिकेट्स काढा अन्यथा अंगावर वर्दी ठेवणार नाही अश्या दिल्या होत्या धमक्या..

    एका पोलिसाच्या वर्दी वरील नेमप्लेट घेतली काढून..

    दोन तरुण आणि दोन महिलांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 29 May 2021 08:02 AM (IST)

    कोरोनामुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यात अनेक मुलांचे हरवले छत्र

    औरंगाबाद -

    कोरोनामुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यात अनेक मुलांचे हरवले छत्र

    औरंगाबादेत 234 मुलांनी गमावले पालक

    11 मुलांनी गमावले आई आणि वडीलही

    तर 223 मुलांपैकी कुणी गमावली आई तर कुणी गमावले वडील

    कोरोनामुळे काहींना गमावला मायेचा पदर तर कुणी वडिलांची पाठेवरची थाप गमावली..

    234 मुलांच्या पुनर्वसनासाठी शासन करणार प्रयत्न

  • 29 May 2021 08:01 AM (IST)

    राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुर्नरचना

    पुणे

    राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुर्नरचना

    5 नवीन सदस्यांची केली निवड,

    नैसर्गिक आपत्तीत सदस्य सुचविणार पर्याय,

    अतिवृष्टी, पुर, भूकंप, चक्रीवादळ याचा प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापनात अभ्यास केला जाणाराय,

    राज्याचे मुख्यमंत्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील व मदत पुर्नवसन मंत्री हे पदसिद्ध सदस्य असतील,

    राजेंद्र पवार, प्रभाकर देशमुख, संजय लाखे, महेश कांबळे आणि रवी सिन्हा या पाच नवीन सदस्यांचा समावेश आहे

  • 29 May 2021 08:00 AM (IST)

    सोलापुरात कोरोनाची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

    सोलापूर - कोरोनाची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

    तपासणी अहवाल पॉझिटिव आल्यानंतर स्वतःची आणि कुटुंबियांची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

    मृदुला देवस्थळे यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह

    मात्र त्या खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगून राहत उद्या घरात त्यांच्या संपर्कातील तीन जणांना पालिका प्रशासन पाठवणार होते क्वारटाइन सेंटरला

    मात्र पालिका प्रशासनाच्या डॉक्टराना प्रतिसाद न दिल्यामुळे फौजदार चावडी पोलिसात फिर्याद

  • 29 May 2021 07:55 AM (IST)

    औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचा कहर, 300 च्यावर म्युकरमायकोसिसचे रुग्ण

    औरंगाबाद -

    औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचा कहर

    औरंगाबादेत 300 च्या वर म्युकरमायकोसिसचे रुग्ण

    फक्त शहरात आढळले 311 रुग्ण तर सर्वाधिक रुग्ण घाटी रुग्णालयात घेतायत उपचार ..

    काहींना गमवावा लागला डोळा तर काहींचा काढला जबडा..

    म्युकरमायकोसिसची नाकापासून होते सुरुवात तर पसरतो मेंदूत..

    म्युकरमायकोसिसच्या औषधीच्या तुटवड्यामुळे उपचारात मोठे अडथळे

  • 29 May 2021 07:48 AM (IST)

    राज्यातील 18 साखर कारखान्याचे ऑक्सिजन प्लांट महिनाभरात होणार सुरू

    पुणे

    राज्यातील 18 साखर कारखान्याचे ऑक्सिजन प्लांट महिनाभरात होणार सुरू,

    ऑक्सिजन प्लांटसाठी लागणारी रेडी टू युज ही यंत्रसामुग्री परदेशातून मागवण्यासाठी 18 कारखान्यांनी केलं बुकींग,

    साधारण 50 लाख ते 1 कोटीच्या आसपास येणार खर्च,

    मात्र 18 कारखान्यात प्रकल्प सुरू झाल्यास दीड हजार ऑक्सिजन सिलेंडर होणार उत्पादित,

    उस्मानाबाद जिल्ह्यातील ( धाराशिव साखर कारखान्याचा ) ऑक्सिजन प्लांटही सुरू झालाय, या जिल्ह्यासाठी हा महत्वाचा ठरतोय,

    साखर आयुक्त कार्यालयाकडे या 18 कारखान्यांनी नोंदणी केलीये

  • 29 May 2021 07:16 AM (IST)

    कोरोनात निराधार, विधवा झालेल्या महिलांसाठी योजना आखा, उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

    - उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

    - ‘कोरोनात निराधार, विधवा झालेल्या महिलांसाठी योजना आखा’

    - ‘योजना आखून कोरोनात विधवा झालेल्या निराधार महिलांना मदत करा’

    - कोरोना निराधार पालकत्व योजना राज्यभर राबवण्याची मागणी

    - आ. राजू पारवे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

    - कोरोनामुळे घरचा कर्ता पुरुष गेल्याने अनेक परिवारावर ओढवलं संकट

  • 29 May 2021 07:12 AM (IST)

    मुंबईत लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला, नवी नियमावली मंगळवारी येणार

    मुंबई -

    लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला

    नवी नियमावली मंगळवारी येणार

    1 जूनपासून शासकीय, खासगी कार्यलये 50 टक्के क्षमतेने सुरु होण्याची शक्यता

    7 ते 11 सुरु असलेल्या अत्यावश्यक सेवेतील दुकाना वेळ वाढवून मिळणार

    जिल्हाबंदी मात्र 10 जूननंतर उठवण्याची शक्यता

  • 29 May 2021 07:11 AM (IST)

    नागपुरात व्हेंटीलेटरवर गेलेल्या ५५ टक्क्यांवर कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

    - व्हेंटीलेटरवर गेलेल्या ५५ टक्क्यांवर कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

    - नागपूरातील मेयो, मेडीकलसह खाजगी कोरोना रुग्णालयातली स्थिती

    - १ मार्च २०२० ते २७ एप्रिल २०२१ पर्यॅत मेयोत व्हेंटीलेटरवरील २०८१ रुग्णांचा मृत्यू

    - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटीलेटरवरील सर्वाधीक मृत्यू

  • 29 May 2021 07:00 AM (IST)

    कोरोनाच्या संकटात नागपूर मनपाची आरोग्यासाठी केवळ २ टक्के तरतूद

    नागपूर -

    - कोरोनाच्या संकटात नागपूर मनपाची आरोग्यासाठी केवळ २ टक्के तरतूद

    - महानगरपालिकेच्या बजेटसाठी अवघ्या ५५.४४ कोटींची तरतूद

    - आरोग्यासाठी नगरसेवकांची ४०० ते ५०० कोटींच्या तरतुदीची होती मागणी

    - तोकड्या बजेटने मनपा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार?

    - नागपूर महानगरपालिकेला नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे?

    - मनपाच्या आरोग्य बजेटवर सर्वसामान्यांचा संताप

  • 29 May 2021 06:54 AM (IST)

    मास्क न घालता प्रवास करणाऱ्या कोलकाता राईडर्सचा खेळाडू राहुल त्रिपाठी याच्यावर पुणे पोलिसांची कारवाई

    पुणे

    मास्क न घालता प्रवास करणाऱ्या कोलकाता राईडर्सचा खेळाडू राहुल त्रिपाठी याच्यावर पुणे पोलिसांची कारवाई

    पुणे पोलिसांनी ठोठावला त्रिपाठीला पाचशे रुपयांचा दंड

    पु्ण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकात करण्यात आली ही कारवाई

  • 29 May 2021 06:49 AM (IST)

    कोरोनाच्या तुलनेत म्युकरमायकोसिसचा मृत्युदर अधिक ..घाबरून जाऊ नका, तातडीने उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

    नागपूर : कोरोनाची साथ ओसरली असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट ओढावले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ९६० रुग्णांची नोंद झाली असून ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कदायक म्हणजे, कोरोनाचा मृत्यूदर १.८७ टक्के असताना म्युकरमायकोसिसचा दर ७.९४ टक्क्यांवर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ४८.८१ टक्के आहे. लक्षणे दिसताच उपचार घेतल्यास हा आजार बरा होत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. लोकमत

  • 29 May 2021 06:40 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत 20 हजार 740 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 424 रुग्णांचा मृत्यू

    महाराष्ट्राला मोठा दिलासा, कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

    राज्यात गेल्या 24 तासांत 20 हजार 740 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    424 रुग्णांचा मृत्यू

    तर 31 हजार 671 रुग्णांची कोरोनावर मात

Published On - May 29,2021 9:15 PM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.