कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकार आधार देणार?, यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी एक महत्वाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार असल्याची माहिती दिली आहे.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकार आधार देणार?, यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 8:44 PM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यात थैमान घातलं. या लाटेत राज्यातील हजारो लोकांचा मृत्यू झाला. अनेक मुलं अनाथ झाली. अशा अनाथ मुलांना आधार देण्याबाबत सरकार दरबारी उपाययोजना राबवण्याबाबत हालचाली सुरु आहेत. त्यचाच भाग म्हणून अनाथ मुलांच्या शिक्षणाबाबत शुक्रवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाचा प्रस्ताव मांडलात. त्यानंतर आता महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी एक महत्वाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार असल्याची माहिती दिली आहे. (Yashomati Thakur’s proposal to CM Uddhav Thackeray for children orphaned by corona)

यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी महिला व बालविकास विभागाकडून एक योजना ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नावावर 5 लाख रुपये मुदत ठेव योजना सुरु करता येईल का, ज्याद्वारे या बालकांना त्या रमकेवरील व्याज मिळत राहील, असा एक प्रस्ताव असल्याचं ठाकूर म्हणाल्या. त्याचबरोबर कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करुन दरमहा 2 हजार 500 रुपये मदत मिळेल, असाही एक प्रस्ताव असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. या दोन्ही प्रस्तावांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिलीय.

अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी वर्षा गायकवाड यांचा प्रस्ताव

कोरोनामुळे अनेक विद्यार्थी अनाथ झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे आई आणि वडील कोरोनाच्या कचाट्यात सापडून मृत्युमुखी पडले. अशा विद्यार्थ्यांना सरकारच्या माध्यमातून शिक्षण देण्यात यावे असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याची माहिती यावेळी गायकवाड यांनी दिलीय. त्यात विद्यार्थ्यांचं माध्यमिकपर्यंतचं शिक्षण शालेय शिक्षण विभागामार्फत तर उच्च शिक्षण उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत करण्याचा हा प्रस्ताव असल्याचं गायकवाड म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांकडूनही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

फडणवीसांनी 100 अनाथ मुलांचा हात दिला

नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी प्रमुख असलेल्या श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सोबत’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या 100 मुलांना आधार देण्याचं काम या ट्रस्टद्वारे करण्यात येत आहे. त्याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या मुलांची संपूर्ण जबाबदारी आपण घेतो. ट्रस्टने मुलांची सर्व व्यवस्था राबवावी, मी संपूर्ण पाठबळ देतो, असं म्हटलंय. त्याचबरोबर कुणाला हा विचार संकुचित वाटेल. पण मी ही एक लोकप्रतिनिधी आहे. मलाही मतदारसंघ आहे. या 100 मुलांव्यतिरिक्त दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जेवढे असे मुलं असतील त्या सर्वांची जबाबदारी मी घेईन, असं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिलंय.

संबंधित बातम्या : 

कपडे-भांड्यांसाठी 5 हजार, नष्ट घरांसाठी दीड लाख, तौत्के वादळग्रस्त्रांना मदत जाहीर

मंत्रिमंडळाची मान्यता, वैद्यकीय शिक्षण विभाग 15 ते 20 हजार पदं भरणार : अमित देशमुख

Yashomati Thakur’s proposal to CM Uddhav Thackeray for children orphaned by corona

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.