कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेला फक्त चारच खांदेकरी

कॅलिफोर्नियाहून आलेल्या 63 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली होती. पण 14 दिवसानंतर या पुरुषाचा रिपोर्ट निगेटिव्ह (corona patient died satara) आला होता.

कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेला फक्त चारच खांदेकरी

सातारा : कॅलिफोर्नियाहून आलेल्या 63 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली होती. पण 14 दिवसानंतर या पुरुषाचा रिपोर्ट निगेटिव्ह (corona patient died satara) आला होता. पण काल (6 एप्रिल) पहाटे या कोरोना बाधित रुग्णाचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोरोना बाधित असल्याने संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेला कोणीही नातेवाईक येऊ शकले नाही. अंत्ययात्रेसाठी फक्त चार लोक खांद्या देण्यासाठी उपस्थित (corona patient died satara) होते.

निधन झालेल्या 63 वर्षीय पुरुषाची पत्नी सध्या विलगीकरण कक्षात असून मुलगाही कोरोना संकटामुळे परदेशात अडकला आहे. त्यामुळे घरातील कोणालाच अंत्यदर्शन झाले नाही. प्रशासनाकडून या व्यक्तीच्या अंत्ययात्रेची काळजी घेण्यात आली. अंत्ययात्रेसाठी फक्त चार लोक खांदा देण्यासाठी उपस्थित होते.

मृतदेह हा पूर्ण सॅनिटायझर करून पॅकिंग करुन खांदेकरी संगममाहुली येथील स्मशान भुमीमध्ये घेऊन आले होते. त्यांना देखील योग्य ती खबरदारी आरोग्य विभागाने करुन दिली होती. मात्र या अंत्यसंस्कारासाठी अशा पध्दतीने जवळचे नातेवाईक, घरातील सदस्य कोणच उपस्थित राहू शकत नसल्याने शासनाच्याच कर्मचाऱ्यांनी हा अंत्यविधी उरकला.

धक्कादायक बाब म्हणजे 14 दिवसानंतरचा त्या व्यक्तीचा रिपोर्ट हा निगेटीव्ह आला होता. मात्र काल 15 व्या दिवशी या व्यक्तीचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू हदयविकार आणि कोविड 19 या आजारामुळे झाले असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घोषीत केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *