APMC मार्केटमधील आणखी 6 जणांना कोरोना, आकडा 12 वर, माथाडी कामगार, ग्राहक, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मसाला मार्केटमधील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कोरोनाबाधित वेटरच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

APMC मार्केटमधील आणखी 6 जणांना कोरोना, आकडा 12 वर, माथाडी कामगार, ग्राहक, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 1:24 AM

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील कोरोना रुग्णांच्या (Corona Patient In APMC Market) संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मसाला मार्केटमधील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कोरोनाबाधित वेटरच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता एपीएमसीमधील कोरोना रुग्णाची संख्या 12 वर (Corona Patient In APMC Market) पोहोचली आहे.

पहिल्यांदा एपीएमसी मार्केटमध्ये (27 एप्रिल) एका भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 28 एप्रिलला एपीएमसी धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली. कोरोनाबाधित होणाऱ्या व्यापारी धान्य मार्केटच्या G विंगमध्ये व्यापार करत होता. हा व्यापारी कोपरखैरणेमधील रहिवासी आहे. याआधी L विंगमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला, एका हॉटेल कर्मचाऱ्याला आणि त्याची संपर्कात आलेल्या 6 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने मार्केटच्या प्रवेशद्वाराबाहेर सोशल डिस्टन्सिंगसाठी बॅरिकेट्स लावले आहेत. प्रवेशद्वारावर सॅनिटाईझ करुन गाड्यांना आत प्रवेश दिला जात आहे. मात्र, मार्केटच्या आत प्रवेश केल्यावर व्यपारी आणि ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग येथे पाळला जात नसल्याने कोरोना (Corona Patient In APMC Market) रुग्णामंध्ये वाढ होत आहे.

एपीएमसी येथील कांदा बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला आणि धान्य मार्केट सुरु आहे. टर्मिनल मार्केट असल्याने येथे मोठ्या प्रमाणात ग्राहक ये-जा करत आहेत त्यामुळे गर्दी होत आहे. त्यामुळे येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या माथाडी कामगार, ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एपीएमसीमध्ये कोरोनाचा गुणाकार सुरु झाल्याने नवी मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यापारी, दलाल, ग्राहक, माथाडी कामगार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरु झाले आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 188 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत (Corona Patient In APMC Market) मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

राज्यात दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 9,318 वर

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले, कुटुंबियांना मोठा दिलासा

भिवंडी मनपा कम्युनिटी किचनमध्ये तांदळाची वानवा, 6 हजार कामगार दुपारी उपाशीच

Pune Corona Update | …तर 18 मेपर्यंत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9600 पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.