नवी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, एकाच दिवसात 129 नवे रुग्ण

नवी मुंबईत काल (12 जून) 129 नव्या रुग्णांची नोंद झाली (Corona Patient Increase Navi Mumbai) आहे.

नवी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, एकाच दिवसात 129 नवे रुग्ण

नवी मुंबई : नवी मुंबईत काल (12 जून) 129 नव्या रुग्णांची नोंद झाली (Corona Patient Increase Navi Mumbai) आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3543 पर्यंत पोहोचला आहे. काल 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 109 नागरिकांचा मृत्यू झाला (Corona Patient Increase Navi Mumbai) आहे.

नवी मुंबईत काल दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर 17, नेरुळ 13, वाशी 12, तुर्भे 22, कोपरखैरणे 33, घणसोली 19, ऐरोली 8, दिघा 5 येथील रुग्णांचा समावेश आहे.

नवी मुंबईत काल एका दिवसात 126 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर 10, नेरुळ 36, वाशी 9, तुर्भे 17, कोपरखैरणे 18, घणसोली 16, ऐरोली 17, दिघा 3 असे एकूण 126 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2124 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत सध्या 1310 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पनवेलमध्ये कोरोनाचे नवे 30 रुग्ण

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात काल कोरोनाचे नवे 30 रुग्ण आढळले आहेत. त्यासोबत 5 वर्षाच्या चिमुरड्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. तर तळोजा पचनंद येथील एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. पनवेलमध्य 20 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाची एकूण आकडेवारी आता 891 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 37 जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | दिवसभरात 3,493 नवे रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण संख्या 1 लाखांवर

पुणे विभागातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 62.95 टक्के, 8 हजार 862 जण कोरोनामुक्त

जळगावात एकाच दिवसात 52 कोरोना रुग्ण, एकूण रुग्ण 1541

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *