Corona Positive Story | मार्च महिन्यात गावातील 107 जण बाधित, साकेगावच्या नागरिकांनी कोरोनाला कसं गाडलं ?

भुसावळ तालुक्यातील सोनगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. संपूर्ण गाव सुन्न झालं होतं. मात्र, या गावाने यशस्वीपणे परिस्थितीत हाताळत कोरोनावर मात केली (Corona Positive Story).

Corona Positive Story | मार्च महिन्यात गावातील 107 जण बाधित, साकेगावच्या नागरिकांनी कोरोनाला कसं गाडलं ?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर असा होणार परिणाम

जळगाव : राज्यासह देशभरात कोरोनाचं थैमान (Corona Pandemic) सुरु आहे. देशात दररोज 3 लाखापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहे. बाधितांसह मृतकांचा आकडाही प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत भुसावळच्या सोनगाव या गानाने कोरोनाला हरवलं आहे. भुसावळ तालुक्यातील सोनगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. संपूर्ण गाव सुन्न झालं होतं. मात्र, या गावाने यशस्वीपणे परिस्थितीत हाताळत कोरोनावर मात केली. सोनगावच्या गावकऱ्यांनी कोरोनाला गाडलं? याचबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Corona Positive Story).

गावातील 80 टक्के नागरीक आजारी

राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू झाला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरालगत असलेल्या साकेगावमध्ये कोरोना रुग्णांचा उद्रेक पाहायला मिळाला. साकेगावात मार्च महिन्यामध्ये 107 कोरोना बाधित रुग्ण सापडले. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. गावातील नागरीक कुणीही टेस्ट करण्यासाठी पुढे येत नव्हते. गावातील 80 टक्के नागरिक आजारी पडले होते (Corona Positive Story).

प्रशासनाचं भक्कम काम

ग्रामपंचायत कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर यांनी तात्काळ घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण केले. जे रुग्ण पॉझिटिव्ह येतील अशांना गावातच विलगीकरण कक्ष सुरू करून भरती केलं. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्या ठिकाणी छोटे-छोटे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले. ज्या रुग्णांना लक्षणे आढळून येत होते अशांना त्वरित उपचार करून विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले.

गावात नेमक्या काय उपाययोजना?

गावाबाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंद करण्यात आलं. या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता आणि फवारणीकडे लक्ष देण्यात आले. उपसरपंच आनंद ठाकरे यांनी स्वतः गावामध्ये स्पीकरवरून कोरोना विषयी मार्गदर्शन देण्याचे काम केले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने गावांमध्ये महाआरोग्य शिबिरही घेण्यात आले. गावातील प्रत्येक चौकांमध्ये स्वच्छ हात धुण्यासाठी उपाययोजना करण्यात आली.

आमदार संजय सावकारे यांच्याकडून ग्रामपंचायतीला बक्षीस

प्रशासनाच्या वतीने ज्या गाईडलाईन्स मिळत गेल्या त्या गाईडलाईन्सचा उपयोग केल्यामुळे आज साकेगावमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. स्मार्ट व्हिलेज असणाऱ्या या गावची आठ हजार लोकसंख्या असून साकेगाव आज कोरोनामुक्त झाला आहे. ग्रामपंचायतीच्या या विशेष कामगिरीमुळे भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी ग्रामपंचायतीला 24 हजाराचे रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले आहे.

हेही वाचा : हृदयविकाराच्या झटक्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू का होतोय?; वाचा लक्षणे आणि उपचार

Published On - 6:26 pm, Wed, 5 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI