AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न समारंभातून कोरोना वाढला, मुंबईत तूर्तास संचारबंदी नाही; पालिका अतिरिक्त आयुक्तांचं मोठं विधान

मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातून कोरोना संसर्ग वाढल्याची धक्कादायक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. (coronavirus: no curfew imposed in mumbai says suresh kakani)

लग्न समारंभातून कोरोना वाढला, मुंबईत तूर्तास संचारबंदी नाही; पालिका अतिरिक्त आयुक्तांचं मोठं विधान
मुंबई महापालिका
| Updated on: Feb 22, 2021 | 6:37 PM
Share

मुंबई: मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातून कोरोना संसर्ग वाढल्याची धक्कादायक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सध्यातरी मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा विषय अजेंड्यावर नसल्याचंही काकाणी यांनी सांगितलं. (coronavirus: no curfew imposed in mumbai says suresh kakani)

सुरेश काकाणी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बार, पब आणि रेस्टॉरंटसह मंगल कार्यालयांवर कारवाई केली जात आहे. सध्या मुंबईत 82 टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. फक्त 18 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतील आहेत, असं काकाणी यांनी सांगितलं.

तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही

मुंबईकरांनी कोरोना नियमांची काटेकोर अमलबजावणी करावी. त्यांनी कोरोना नियमाची काटेकोर अमलबजावणी केल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. तसेच संचारबंदी लागू करण्याचा विषयही अजेंड्यावर नाही. मुंबईत सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यापेक्षा लोकांमध्ये कोरोना विषयक जागृती करण्यावर भर देण्यात येत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पोलिसांची मदत घेऊ

मुंबईकरांनी मास्क लावणं बंधनकारक आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. प्रसंगी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाईल. अशा लोकांकडून पोलीस जो दंड वसूल करतील त्यातील 50 टक्के रक्कम महापालिकेला मिळेल आणि उरलेली 50 टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीला देण्यात येईल, असंरही त्यांनी सांगितलं.

बेड, कोविड सेंटर पुरेसे

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मुंबईतील कोविड सेंटर आणि बेड्स पुरेसे आहेत. या आधी कोरोनाचा जो प्रोटोकॉल पाळण्यात आला. तोच आताही पाळण्यात येईल. तसे आदेशच आले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईची सद्यस्थिती काय?

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत आहे. मुंबईत काल 921 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. (coronavirus: no curfew imposed in mumbai says suresh kakani)

मुंबईतील कोरोना अपडेट

24 तासात नवे रूग्ण – 921 24 तासात मृत्यू – 6 एकूण रूग्ण – 3,19,128 एकूण मृत्यू – 11,446 एकूण डीस्चार्ज – 3,00,959 अॅक्टीव्ह रूग्ण – 5859 (coronavirus: no curfew imposed in mumbai says suresh kakani)

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

मंत्रालयाला कोरोनाचा विळखा, आठ कर्मचाऱ्यांना लागण

(coronavirus: no curfew imposed in mumbai says suresh kakani)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.