Reality Check | स्मशानभूमीत अनेक ठिकाणी शवदाहिन्या बंद, मृतदेहांना घेऊन नातेवाईक तासंतास रांगेत, कल्याण डोंबिवलीतील भयाण वास्तव

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्मशानभूमींमध्ये काय स्थिती आहे, त्याचा रिअ‍ॅलीटी चेक 'टीव्ही 9 मराठी'ने केला. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली (crematoria are not working in many cemetery In Kalyan Dombivli).

Reality Check | स्मशानभूमीत अनेक ठिकाणी शवदाहिन्या बंद, मृतदेहांना घेऊन नातेवाईक तासंतास रांगेत, कल्याण डोंबिवलीतील भयाण वास्तव

कल्याण (ठाणे) : कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांच्या मृतदेहाचा अंत्यविधी शवदाहिनीवर केला जातो. मात्र काही ठिकाणी शवदाहिनी बंद पडल्याने मृतदेहावर अंत्यविधी लाकडावर करण्याची वेळ आली आहे. यामुळे मृतांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण एका स्मशानभूमीत सात ते आठ कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांचे मृतदेह आणले जातात. लाकडावर अंत्यविधी करण्यासाठी पाच ते सहा तासांचा वेळ खर्ची होतो. त्यामुळे अन्य मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास विलंब होतो, अशी माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये समोर आली आहे (crematoria are not working in many cemetery In Kalyan Dombivli).

मृतक रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ही एक लाखाच्या पार गेली आहे. दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. यात उचपारा दरम्यान काही रुग्णांचा मृत्यू होतो. एकीकडे कोरोनाचा उद्रेक दुसरीकडे ऑक्सीजन, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. पण हेही असे की थोडके आता स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकाना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

केडीएमसीतील स्मशानभूंमध्ये नेमकी परिस्थिती काय?

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्मशानभूमींमध्ये काय स्थिती आहे, त्याचा रिअ‍ॅलीटी चेक ‘टीव्ही 9 मराठी’ने केला. लाल चौकी येथील स्मशानभूमीत शवदाहिनी बंद असल्याने लाकडावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. इथे एकाच वेळी चार कोविड रुग्णांचा मृतदेह जाळला जात आहे. एका मृतदेहाचा अंत्यविधी करण्यासाठी चार ते पाच तासाचा वेळ जातो. त्यामुळे अन्य मृतदेहाच्या अंत्यविधी प्रतिक्षा करावी लागते. याचा त्रास स्मशानभूमी येथील कर्मचाऱ्यांना सुद्धा होत आहे.

कल्याण पश्चिमेतील पौर्णिमा चौक स्मशानभूमीत शवदाहीनी सुरु होती. कल्याणच्या बैलबाजार स्मशानभूमीत शवदाहिनी सुरु होती. मात्र रात्री ही शवदाहिनी बंद ठेवली जाते. कल्याण पूर्व भागातील विठ्ठलवाडी स्मशानभूमीतील शवदाहिनी सुरु होती. मात्र, या शवदाहिनीत केवळ तीन ते चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जातो. डोंबिवली येतील पाथर्ली स्मशानभूमीत रात्री शवदाहिनी खराब झाल्याने बंद होती. तात्पुरती सुरु करण्यात आली असली तरी तिची संपूर्ण दुरुस्तीचे काम बाकी आहे.

‘यापुढे अशी परिस्थिती उद्भवणार नाही’

या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना कोळी देवनपल्ली यांनी प्रतिक्रिया दिली. तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या आहे. ज्या ठिकाणी शवदाहिनी खराब आहे त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु आहे. यापुढे समस्या होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली (crematoria are not working in many cemetery In Kalyan Dombivli).

संबंधित बातमी : नि:शब्द ! जीव वाचवण्यासाठी रुग्णांना खुर्चींवर झोपवून ऑक्सिजन, कल्याणमधील विदारक वास्तव

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI