Parambir singh : परमबीर सिंह, वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल, जबाबात ACP चे मोठे खुलासे

खंडणी प्रकरणात 1 नंबर म्हणजे परमबीर सिंह असा जबाब वाझेबरोबरच एसीपी संजय पाटील यांनीही दिला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.

Parambir singh : परमबीर सिंह, वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल, जबाबात ACP चे मोठे खुलासे
अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपलं निलंबन रद्द करण्यासाठी अर्ज केला

मुंबई : राज्याच्या पोलीस खात्यात आणि राजकारणात खळबळ माजवलेल्या खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेने आज परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्याविरोधात आज पहिलं दोषारोपपत्र दाखल केलंय. या प्रकरणात आतापर्यंत 36 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेत. एसीपी संजय पाटील यांनी वाझे आणि परमबीर यांच्याविरोधात जबाब दिलाय. त्या जबाबात काही खळबळजनक खुलासे त्यांनी केले आहेत. त्यामुळे एसीसीपी पाटील यांचा जबाब अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

खंडणी प्रकरणात परमबीर नंबर 1

एसीपी पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे बार आणि हॉटेल मालक यांच्या मिटिंगवेळी सचिन वाझेने त्यांना सांगितलं होतं की, 1 नंबर परमबीर सिंह हेच आहेत. 1 नंबर म्हणजे परमबीर सिंह असा जबाब वाझेबरोबरच एसीपी संजय पाटील यांनीही दिला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. बार चालकांकडून सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे.

गुन्हे शाखेच्या हाती महत्वाच्या ऑडिओ क्लीप

गोरेगाव खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेच्या हाती 69 ऑडिओ क्लीप लागल्या आहेत. ज्या खंडणी प्रकरणाशी संबंधित आहेत. या सर्व ऑडिओ क्लीप एका पेनड्राईव्हमध्ये एकत्र करून त्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने मुंबई पोलीस दलातील आतापर्यंत 7 पोलीस अधिकाऱ्यांचे गोरेगाव खंडणी प्रकरणात जबाब नोंदवलेत. अधिकाऱ्यांनी वाझे खंडणी रॅकेट कसे चालवत होता, कोणावर कारवाई करायची? कोणावर नाही? याच्या कशा प्रकारे सूचना देत होता हेही सांगितले आहे. मुंबईतल्या बुकींची नावे आणि माहिती वाझेने काही अधिकाऱ्यांकडे मागितली होती. त्यापैकी काही बुकींवर कारवाई करू नये, अश्या सूचना वाझेने दिल्या होत्या. त्यामुळे आता तरी हे प्रकरण वाझे आणि परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढवणार हे निश्चित झालं आहे. यात आणखी कुणाची नावं समोर येतात? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उत्तर भारतात काळ्या कभिन्न ढगात चमकली उजेडाची रेषा, गूढ प्रकाशाने काळजाचा ठोका चुकला; कोणी म्हणालं, एलियन्स तर कोणी म्हणालं…

‘फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही’, जयंत पाटलांचा खोचक टोला

धावती लोकल पकडताना पडलेल्या महिलेचे जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण ; घटना CCTV कैद

Published On - 7:15 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI