विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी सध्या ऐकायला मिळत आहेत. अशावेळी अजित पवार यांनी विमा कंपनींच्या प्रतिनिधींना इशारा दिलाय.

विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा
अजित पवार यांचा पीक विमा कंपन्यांना इशारा


मुंबई : शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी सध्या ऐकायला मिळत आहेत. अशावेळी अजित पवार यांनी विमा कंपनींच्या प्रतिनिधींना इशारा दिलाय. (Ajit Pawar’s warning to the employees of crop insurance companies)

राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्यसरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित पवार यांनी सांगितले. आम्ही वेडंवाकडं करा असं काही सांगत नाही. पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला… कास्तकऱ्याला पीक विमा मिळू शकतो, तो मिळाला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

विमा अर्जांचे गठ्ठे थेट ऊसाच्या फडात!

नांदेडमध्ये पीक विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याचा बेजाबदारपणा समोर आलाय. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडे भरुन दिलेले अर्ज थेट ऊसाच्या फडात आढळून आले आहेत. त्यामुळे विमा रक्कम देण्याची विमा कंपनीची किती मानसिकता आहे हे लक्षात येते. एक नव्हे…दोन नव्हे तर तब्बल 500 अर्ज हे ऊसाच्या फडात सापडले आहेत. त्यामुळे कसली मदत आणि काय? शेतकऱ्याच्या परस्थितीचा चेष्टा केली जात असल्याची भावना आता व्यक्त होऊ लागली आहे.

नुकसानभरपाईसाठी पूर्वसूचना करताना सूचनांचा पाऊस, शिवाय अर्जात चूक झाली तर परतावा मिळणार नाही अशी समज शेतकऱ्यांनाच दिली जाते, मात्र, पीक विमा कंपनीकडून किती अंधाधुंद कारभार होतोय याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालु्क्यातील आंतरगाव येथे आला आहे. शिवाय नुकसानभरपाईत आपली नोंद करावी म्हणून या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसेही घेतले असल्याचा आरोप आहे.

मागणी कारवाईची, बोळवण चौकशीची

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोडकळीस आलेला आहे. अशात विमा कंपनी आणि सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. पण ही मदत तर दूरच पण हक्काच्या पैशासाठीही यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर येत आहे. पीकविम्याचे अर्जच गहाळ केले जात असले तर मदत काय मिळणार ? त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या :

मेळावे आणि चित्रा वाघांना प्रत्युत्तर यापलीकडे चाकणकरांनी महिलांसाठी काय केलं? शालिनी ठाकरेंना सवाल

‘मंत्रालय बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी लुटत होते’, सोमय्यांचा पुन्हा मुश्रीफांवर घणाघात; राजीनाम्याचीही मागणी

Ajit Pawar’s warning to the employees of crop insurance companies

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI