Maharashtra Corona Update : राज्याची चिंता वाढली, दिवसभरात 6 हजार नवे कोरोना रुग्ण; आकडा वाढला, निर्बंधही वाढणार?

Maharashtra Corona Update : राज्याची चिंता वाढली, दिवसभरात 6 हजार नवे कोरोना रुग्ण; आकडा वाढला, निर्बंधही वाढणार?
corona virus news

कोरोनाग्रस्तांची संख्या हजारोंनी वाढली असून कालच्या तुलनेत आज 1000 नव्या रुग्णांची भर पडली आहे. (daily state corona patient report maharashtra)

prajwal dhage

|

Feb 23, 2021 | 8:39 PM

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने नव्याने डोके वर काढले आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांत कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. आजसुद्धा (23 फेब्रुवारी) कोरोनाग्रस्तांची संख्या हजारोंनी वाढली असून कालच्या तुलनेत आज 1000 नव्या रुग्णांची भर पडली आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. (daily state Corona patient report update of Maharashtra)

आज दिवसभरात कोरोनाचे 6218 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तसेच, 5869 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.96 टक्क्यांवर आहे. तर दिवसभरात 51 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.45 टक्क्यांवर आहे. अशाच प्रकारे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली, तर आगामी काळात हा मृत्यूदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 12 हजार 312 वर पोहोचला आहे. काल राज्यात  5 हजार 210 कोरोनारुग्णांची नोंद झाली होती. तर काल दिवसभरात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.

या शहरांना जास्त धोका ?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, ठाणे, नाशिक या शहरांमध्ये सध्या अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आगामी काळात अशाच प्रकारे कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. सध्या राज्यात पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित असून अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9399 एवढी आहे. तर मुंबई, ठाण्यात अनुक्रमे 6119 आणि 6177 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. अमरावतीमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5595 एवढी आहे. तर नागपुरात सक्रिय कोरोनाग्रस्तांचा आकडा 6832 वर पोहोचला आहे.

कोणत्या शहरात किती रुग्ण? :

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई32053230209411454
ठाणे2769092649205781
पालघर4867647223939
रायगड70182678331584
रत्नागिरी1203311358415
सिंधुदुर्ग65796183177
पुणे 4023093848218040
सातारा 5804655370 1838
सांगली 51227 489511791
कोल्हापूर 49495 476321674
सोलापूर 57405 547861838
नाशिक 1258351222192037
अहमदनगर 74220721791127
जळगाव59356563781495
नंदुरबार101699659220
धुळे 1664715987337
औरंगाबाद51299486061256
जालना 1420513538370
बीड1885517869560
लातूर 2526324068703
परभणी 82897625297
हिंगोली 46044317100
नांदेड 2298621796682
उस्मानाबाद 1788717039560
अमरावती 3204526005443
अकोला 1431311762375
वाशिम 81087362162
बुलडाणा 1690814972257
यवतमाळ 1738715903473
नागपूर 1462731359263477
वर्धा 1228011356304
भंडारा 1382513825313
गोंदिया 1451014271173
चंद्रपूर 2455923803411
गडचिरोली 8950876099
इतर राज्य1460085
एकूण2112312200585151857

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : थोडासा दिलासा! सोमवारी 5 हजार 210 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 5 हजार 35 रुग्ण कोरोनामुक्त

(daily state Corona patient report update of Maharashtra)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें