Maharashtra Corona Update : थोडासा दिलासा! सोमवारी 5 हजार 210 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 5 हजार 35 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात सोमवारी कोरोनाचे 5 हजार 210 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 5 हजार 35 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:48 PM, 22 Feb 2021
Maharashtra Corona Update : थोडासा दिलासा! सोमवारी 5 हजार 210 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 5 हजार 35 रुग्ण कोरोनामुक्त
corona virus

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी काहीसा कमी आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे 5 हजार 210 नव्या रुग्णांची नोंद
झाली आहे. 5 हजार 35 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 19 लाख 99 हजार 982 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.96 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 2.46 टक्क्यांवर आहे.(5 thousand 210 new corona patients registered in the state on 22nd February)

सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 57 लाख 93 हजार 424 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 21 लाख 06 हजार 094 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 54 लोक होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 891 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 53 हजार 113 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे.

कोणत्या महामंडळात किती कोरोनाबाधित?

ठाणे मंडळात दिवसभरात 1 हजार 364 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर, पालघर, वसई-विरार, रायगड, पनवेल या शहर आणि महापालिकेचा समावेश आहे.

नाशिक मंडळात आज दिवसभरात 492 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात नाशिक, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, अहमदनगर मनपा, धुळे, धुळे मनपा, जळगाव, जळगाव मनपा, नंदूरबार या शहर आणि महापालिकेचा समावेश आहे.

पुणे मंडळात एकूण 844 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुणे, पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, सोलापूर, सोलापूर मनपा, सातारा याचा समावेश आहे.

कोल्हापूर मंडळात आज दिवसभरात 27 कोरोना रुग्ण वाढले आहेत. यात कोल्हापूर, कोल्हापूर मनपा, सांगली, सांगली मनपा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या महापालिकांचा समावेश होतो.

औरंगाबाद मंडळात एकूण 275 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात औरंगाबाद, औरंगाबाद मनपा, जालना, हिंगोली, परभणी, परभणी मनपा या महापालिकांचा समावेश आहे. (Maharashtra Corona Patient Update 19 February)

लातूर मंडळात एकूण 108 कोरोनाबाधितांची रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात लातूर, लातूर मनपा, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड मनपाचा समावेश आहे. तर अकोला मंडळात आज दिवसभरात एकूण 1400 रुग्णांची नोंद झाली आहे. यात अकोला, अकोला मनपा, अमरावती, अमरावती मनपा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या शहरांचा समावेश आहे.

त्याशिवाय नागपुरात एकूण 946 रुग्णांची नोंद झाली आहे. यात नागपूर, नागपूर मनपा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर मनपा, गडचिरोली या सर्व शहरांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई32284430293011463
पुणे 4053073856408048
ठाणे 2782882655645803
पालघर 4878747218939
रायगड70374679371597
रत्नागिरी1205111415419
सिंधुदुर्ग65956225177
सातारा58358554661839
सांगली51274489741791
नाशिक1269521227392040
अहमदनगर74804724381131
धुळे1679016009337
जळगाव 60073566741502
नंदूरबार 102029724220
सोलापूर57640548741840
कोल्हापूर 49592476801675
औरंगाबाद51877487441267
जालना1432713538378
हिंगोली 46524333100
परभणी84427630297
लातूर 2543924198705
उस्मानाबाद 1793317055563
बीड1895817931562
नांदेड 2310321814685
अकोला 1467211397375
अमरावती 3357226673451
यवतमाळ 1772815994478
बुलडाणा 1721115171258
वाशिम 86527416162
नागपूर1484881366393499
वर्धा 1265311423309
भंडारा1386113307313
गोंदिया 1454414272173
चंद्रपूर2466623812412
गडचिरोली8966877399
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146086
एकूण2129851201236751993

संबंधित बातम्या :

Photo Story: मुंबईकरांचं डोकं फिरलंय का?; धोक्याचा इशारा दिल्यानंतरही क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी!

कोणकोणत्या जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी?, वाचा सविस्तर रिपोर्ट

5 thousand 210 new corona patients registered in the state on 22nd February