डॉक्टरऐवजी कंपाऊंडरने औषधं दिल्याचा दावा, 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागरिकांकडून रुग्णालयाची तोडफोड

वर्ध्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 16 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे (Death of patient due to wrong treatment in Wardha).

डॉक्टरऐवजी कंपाऊंडरने औषधं दिल्याचा दावा, 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागरिकांकडून रुग्णालयाची तोडफोड
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 4:13 PM

वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी अत्यंत जबाबदारीने आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, दुसरीकडे काही डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचेही उदाहरणं समोर येत आहेत. वर्ध्यातील सेलू तालुक्यातील झडशी येथे उपचारासाठी आलेल्या 16 वर्षीय युवकाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे (Death of patient due to wrong treatment in Wardha). या घटनेनंतर गावकऱ्यांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी प्राथमिक चौकशीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई केली आहे.

श्रेयस किशोर नवघरे असं या मृत युवकाचं नाव आहे. मंगळवारी (16 जून) पहाटे 2 वाजल्याच्या दरम्यान त्याच्या पोटात दुखत होतं. त्यामुळे त्याला टाकळी येथून झडशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आलं. मात्र, येथे डॉक्टर हजर नसल्याने त्याच्यावर कंपाउंडरनेच उपचार केले. कंपाउंडरने डॉक्टर रवींद्र देवगडे यांना फोनवर माहिती विचारुन उपचार केले. यानंतर नातेवाईकांनी मुलाला घरी आणले. मात्र परत त्रास वाढत असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले असता त्याचा वाटेतच मृत्यू झाला, अशी माहिती मृताच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

पीडित युवकाच्या कुटुंबीयांनी डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त गावकऱ्यांनी या घटनेनंतर रुग्णालयाची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान प्राथमिक चौकशीत डॉक्टर रवींद्र देवगडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सेलूचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले यांनी दिली.

सेलू पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयात या युवकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

ठाण्यातील दहा मजली कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, महापौरांचा दावा, आयुक्तांवर गंभीर आरोप

Jalgaon Suicide | मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याची आत्महत्या, कॉलेजसमोरच्या विहिरीत उडी

Death of patient due to wrong treatment in Wardha

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.