AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपक केसरकर धास्तावले? म्हणाले, ‘आदित्य ठाकरे यांचे स्वागत, पण, असं करणं…’

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, या दौऱ्यावरून मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावलाय. आमदार, खासदार सोडून गेले आता कार्यकर्ते सुद्धा सोडून जायला सुरुवात होईल, असे केसरकर म्हणालेत. यामागचं नेमकं कारण काय?

दीपक केसरकर धास्तावले? म्हणाले, 'आदित्य ठाकरे यांचे स्वागत, पण, असं करणं...'
Aditya Thackeray VS Deepak KesarkarImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 4:45 PM

सिंधुदुर्ग : 20 सप्टेंबर 2023 | युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या घरी ते भेटी देणार आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्याची मंत्री दीपक केसरकर यांनी धास्ती घेतल्याचे दिसून येतंय. विधानसभा अध्यक्ष यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना म्हणणं मांडण्यासाठी संधी देणे हे योग्य आहे. दोन तृतीयांश संख्याबळ असेल तर तुम्ही व्हीप तोडू शकता. पक्षात लोकशाही असणे आवश्यक असतं. संदर्भात काही नवीन निर्णय झाले तर लोकशाहीला नवीन दिशा मिळेल असे दीपक केसरकर म्हणाले.

मराठा आरक्षण ज्या मुद्द्यावर टिकले नाही त्याचा अभ्यास सरकार करत आहे. पण, आतापर्यंत कोणत्याही केंद्र सरकारने महिला आरक्षण देऊ शकले नाही. ते आताच्या मोदी सरकारने दिले ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे संजय राऊत यांनी केलेलं विधान चुकीचं आहे असे त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांचा दोष नाही…

संजय राऊत हे नेहमी जे भविष्य सांगतात ते खरं होतं असं नाही. संजय राऊत बोलतात त्याच्याबरोबर उलट घडत असतं. तो अंदाज संजय राऊत यांचा आहे असा अंदाज कुणीही बांधू शकतो. पक्षाशी जो एकनिष्ठ असतो तो पक्षाच्या बाजूने बोलत असतो. त्याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

डीलीमिटेशनमध्ये जागांची संख्या वाढली आणि महिलांना आरक्षण मिळाले तर महिला सबलीकरण नक्कीच होईल. चांगली गोष्ट केल्यानंतर त्यातून काही काढायचं आणि चांगल्या गोष्टीचे श्रेय द्यायचं नाही त्यामुळे राजकारणात या गोष्टी थांबल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांनी असं…

आदित्य ठाकरे कोकणात येताहेत ही चांगली गोष्ट आहे. आदित्य ठाकरे यांच्या पक्षासोबत जे नाहीत त्यांच्याही घरी जाणार आहेत. गणरायाच्या निमित्ताने जे सोबत नाहीत त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मी असं एकदाही केलेलं नाही. यातील अनेक जण माझे सहकारी आहेत. ते माझ्याबरोबर वेगळ्या पक्षात होते. पण, आदित्य ठाकरे यांनी असं करणे हे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी गणरायाचे दर्शन अवश्य घ्यावं. पण, त्यांचा हा जो प्रयत्न आहे तो योग्य आहे का ते त्यांनी ठरवावे, असं दीपक केसरकर म्हणालेत. आमदार, खासदार सोडून गेले आता कार्यकर्ते सुद्धा सोडून जायला सुरुवात होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....