AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे आदेश, उमेदवारांना…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. ज्यामध्येच 5 जणांचे निधन झाले. आता नुकताच अत्यंत मोठे आदेश पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे आदेश, उमेदवारांना...
Ajit Pawar Nationalist Congress
| Updated on: Jan 30, 2026 | 7:56 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला अजित पवार विमानाने निघाले. विमान बारामती विमान तळावर लॅंन्ड होण्याच्या तयारीत असताना अगदी धावपट्टीच्या शेजारी विमानाचा मोठा अपघात झाला. ज्यामुळे अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धावपट्टीकडे जात असताना विमान अचानक एका बाजूला कोलमडले आणि थेट शेतात पडले. मोठा स्फोट विमानाचा झाला. अजित पवार यांचे निधन झाले आणि आज ते आपल्यात नाहीत, यावर विश्वास करणे सर्वांसाठीच कठीण आहे. अजित पवार यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांवरच नाही तर राज्यावर दु:ख कोसळले. काल बारामतीसह राज्यात शोककळा होती. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार झाली.

महापालिका निवडणुका अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या पक्षासोबत लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना म्हणावे तसे यश महापालिका निवडणुकीत मिळाले नाही. यामुळे अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या तब्बल 4 सभा बारामतीत होत्या. मात्र, त्यापूर्वीच विमान अपघात झाला.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. ना प्रचार सभा ना रोड शो केले जातील. फक्त मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत,  उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असे स्पष्ट आदेश देण्यात आली. हेच नाही तर निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यामध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही तोंडावर आहेत.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं