maharashtra state corona update | राज्यात तब्बल 15 हजार नवे रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

आज दिवसभरात तब्बल 15 हजार 602 नवे कोरोना रुग्ण आढळले. एकूण 88 जणांचा मृत्यू झाला. (maharashtra state corona information)

maharashtra state corona update | राज्यात तब्बल 15 हजार नवे रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 8:51 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली. सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यातं कोरोनाची स्थिती गंभीर आहे. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. राज्यात आज दिवसभरात तब्बल 15 हजार 602 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात कोरोनामुळे 88 रुग्णांचा मृत्यू झाला. कालच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी अजूनही संकट कमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. (detail information of maharashtra state corona information)

दिवसभरात राज्यात कोरोनाचे रुग्ण किती?

शुक्रवारी दिवसभरात 15817 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर आज हा आकडा कमी झाला असून दिवसभात करोनाचे 15 हजार 602 नवे कोरोना रुग्ण आढळले. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकूण 88 जणांचा मृत्यू झाला; परिणामी मृतांचा आकडा आता 52 हजार 811 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 1 लाख 18 हजार 525 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. दिवसभरात 15 हजार 602 नवे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 लाख 97 हजार 793 वर पोहोचला आहे.

मुंबईत 1709 नव्या रुग्णांची नोंद

राज्याची राजधानी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. मागील 24 तासात मुंबईत 1 हजार 709 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तसेच 24 तासात 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. यासह मुंबईत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 41 हजार 999 वर गेलीय. आतापर्यंत 3 लाख 17 हजार 830 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तसेच एकूण 11 हजार 528 जणांना कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या मुंबईत 11 हजार 747 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहे

पुण्यात तब्बल 1633 नव्या रुग्णांची वाढ

पुण्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. येथे प्रशानाने अनेक निर्बंध लावलेले असूनही कोरोना संसर्ग आटोक्यात येत नाहीये. पुण्यात दिवसभरात 1633 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून दिवसभरात येथे 638 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. उपचार सुरु असताना पुण्यात 13 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. यातील एक रुग्ण हा पुणे जिल्ह्याच्या बाहेरचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात सध्या 10723 सक्रिय कोरोना रुग्ण असून यातील 351 जणांची स्थिती नाजूक आहे. दिवसभरात 1633 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा 215463 वर पोहोचला आहे. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 4937 जणांचा मृत्यू झाला.

नागपुरात 2000 चा आकडा पार

मागील काही दिवसांपासून नागपुरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. येथे आजसुद्धा कोरोनाचा स्फोट झाला. नागपुरात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 2261 कोरोनाग्रस्त आढळले. तर कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला. नागपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 168250 वर पोहोचला असून जिल्ह्यात आतापर्यंत 4447 जणांचा मृत्यू झाला आहे.

अकोल्यात 316 नवे कोरोना रुग्ण

अकोला जिल्ह्यातसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. आज दिवसभरात येथे 316 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 20961 वर पोहोचलाय. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 397 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या येथे 5271 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

यवतमाळमध्ये आतापर्यंत 500 कोरोनाबाधितांचा मृत्यू

यवतमाळ जिल्यामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या जिल्ह्यातसुद्धा कोरोनावर मात करणे शक्य होत नाहीये. येथे आज दिवसभरात 346 नवे कोरोना रुग्ण आढळले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 501 वर पोहोचली आहे. यवतमाळमध्ये सध्या 2477 अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून येथे बाधितांचा आकडा 21 हजार 265 वर पोहोचला आहे.

चंद्रपूरमध्ये 104 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मागील 24 तासांमध्ये चंद्रपूरमध्ये कोरोनाचे 104 नवे रुग्ण आढळले. चंद्रपूरमध्ये कोरोग्रस्तांचा आकडा 24660 वर पोहोचला आहे. येथे आतापर्यंत 23401 जण कोरोनातून बरे झाले आहेत. चंद्रपूरमध्ये सध्या 857 जणांवर उपचार सुरु असून येथे आतापर्यंत 402 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी गाळात परिस्थीती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. जिल्ह्यातील कोरोनास्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार वेगवेळ्या जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना तसे अधिकार आहेत. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलीये. असे असूनदेखील राज्यातील म्हणावे तेवढे सहकार्य केले जात नसल्याची भावना आरोग्य यंत्रणेमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

इतर बातम्या :

Mumbai Corona Updates : मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वाढतीच, नव्याने किती रुग्णांची वाढ, किती मृत्यू?

सचिन वाझे नैराश्यात का?; व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचं कारण समोर?

SEXTORTATION : आधी सेक्स चॅट, मग न्यूड व्हिडीओ कॉल, ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्यापासून सावध रहा

(detail information of maharashtra state corona information)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.