AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा, अखेर मुंबईचे महापाैर पद..

राज्यात महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागले असून अजूनही महापाैर पदाचा तिढा सुटलेला नाही. संपूर्ण राज्याच्या नजरा या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागल्या होत्या. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असूनही महापाैर पदावरून प्रचंड हालचालींना वेग आला.

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा, अखेर मुंबईचे महापाैर पद..
Devendra Fadnavis and Eknath Shinde call
| Updated on: Jan 19, 2026 | 1:16 PM
Share

राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आणि राज्यात एकत्र येऊन युती केलेले पक्ष एकमेकांविरोधात महापालिका निवडणुका लढताना दिसले. फक्त निवडणुकाच विरोधात लढवल्या नाही तर थेट एकमेकांवर गंभीर आरोपही करण्यात आली. अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या विरोधात लढवली. मात्र, तिथे मोठे अपयश अजित पवारांना पचवावे लागले. दोन्ही महापालिकांवर भाजपाची सत्ता होती. 2017 ची निवडणूक आणि आता 2026 ची निवडणूक यात खूप मोठा फरक होता. राज्यात शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे. मात्र, महापालिकांच्या निवडणुकीवेळी सर्व राजकीय गणिते बदलल्याचे बघायला मिळावे. महापालिका निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने अनेक महापालिकांवर एकहाती सत्ता मिळवली. मुंबई महापालिकेवरही सर्वात जास्त नगरसेवक भाजपाचे निवडून आले.

भाजपा 1 नंबरचा पक्ष, शिवसेना ठाकरे गट 2 नंबरचा पक्ष, शिवसेना शिंदे गट 3 नंबरचा पक्ष ठरले आहेत. भाजपाचाच महापाैर मुंबई महापालिकेवर होणार असल्याचे सांगितले गेले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच भाजपाचा महापाैर होईल. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत लढवली. भाजपाला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या.

भाजपा शिवसेना शिंदे गटाच्या मदतीशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाही. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाकरी फिरवत थेट अडीच वर्ष भाजपासोबतच शिवसेनेचा महापाैर होणार असल्याची भूमिका घेतली आणि आपल्या सर्व नगरसेवकांना थेट हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांचा पुढील काही दिवस मुक्काम हा हॉटेलमध्येच असणार आहे.

यादरम्यान आता नुकताच मोठी माहिती पुढे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत महायुतीचा महापौर होणार , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून कळत आहे. मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, दोन्ही प्रमुख नेते दावोस दौर्यानंतर एकत्र बसून यावर तोडगा काढणार आहेत. ठाकरे यांच्या भाजपसोबत जाण्याच्या बातम्या खोट्या असून अफवांवर विश्वास ठेवू नका याबाबतह दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?.
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण.
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत.
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.