AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं तर ते सेफ असतं, कारण…, फडणवीसांचं मोठं विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावरून मिश्किल वक्तव्य केल्याचं पहायला मिळत आहे.   मी आणि एकनाथ शिंदे आम्ही मुख्यमंत्रिपदाची आदला-बदली करत असतो. कधी मी मुख्यमंत्री तर कधी ते मुख्यमंत्री असतात, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं तर ते सेफ असतं, कारण..., फडणवीसांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2025 | 5:50 PM
Share

मंगळवारी बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदावरून मिश्किल वक्तव्य केल्याचं पहायला मिळत आहे.   मी आणि एकनाथ शिंदे आम्ही मुख्यमंत्रिपदाची आदला-बदली करत असतो. कधी मी मुख्यमंत्री तर कधी ते मुख्यमंत्री असतात. शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?   

खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की मी आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही आदलाबदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, तर कधी ते मुख्यमंत्री असतात. कधी मी उपमुख्यमंत्री असतो तर कधी ते उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्यांच्या जागी ते भाषण करणार आहेत. आणि त्यांना जर मुख्यमंत्रिपद दिलं तर ते सेफ असतं, कारण ते परत करतात, आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करतात, हे मला माहिती असल्यामुळे मी रिस्क घ्यायला मागे -पुढे पाहिलेलं नाहीये, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा घराबाहेर पडले, त्याचा आनंद आहे, असा खोचक टोला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. हे चांगलं आहे, विरोधी पक्षांचं ते कामच आहे. पहिल्यांदा उद्धवजी घराबाहेर पडले आहेत, याचा मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाहीत. मी तर यापूर्वीच सांगितंल आहे, विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा, अन् हजार रुपये मिळवा, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक