AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळे चुकले पण फडणवीस यांची भविष्यवाणी ठरली खरी, राज ठाकरेंचा झाला गेम, पण नेमका कसा?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेला मात्र फारसा फायदा झालेला नाही. यावरच फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सगळे चुकले पण फडणवीस यांची भविष्यवाणी ठरली खरी, राज ठाकरेंचा झाला गेम, पण नेमका कसा?
devendra fadnavis and raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 17, 2026 | 5:58 PM
Share

BMC Election Result Devendra Fadnavis : राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. यातील बहुसंख्य महापालिकांत भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर यासारख्या महापालिकांता आता महायुतीचा महापौर बसणार आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महत्त्वाच्या पालिकांत भाजपाचा महापौर होणार आहे. दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज टाकरे हे दन्ही ठाकरे बंदू एकत्र आले होते. या युतीचा उद्धव ठाकरेंना चांगला फायदा झाला असून राज ठाकरे यांना मात्र विशेष फायदा झालेला नाही. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. या विधानानंतर फडणवीस यांनी केलेल्या जुन्या भाकिताचीही आठवण केली जात आहे.

मनसेला मिळाल्या फक्त 6 जागा

मुंबई तसेच इतर महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र आले होते. या दोन्ही भावांनी मुंबईत एकत्र येत झंझावाती प्रचार केला होता. विशेष म्हणजे त्यांनी आयोजित केलेल्या सभांना हजरोंनी गर्दी होत होती. मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी प्रचार केला. मुंबईतील मराठी पट्ट्यात त्याचा फायदाही झालेला पाहायला मिळाला. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर निवडणुकीपूर्वी साधारण 58 नगरसेवक उद्धव ठाकरे यांना सोडून गेले होते. परंतु या निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी करत मुंबईतील आपली ताकद दाखवून दिली. उद्धव ठाकरे यांनी 66 जागांवर विजय मिळवला तर राज ठाकरे यांना फक्त 6 जागांवर विजयी होता आले. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी ठाकरे बंंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंचा फायदा होईल. परंतु राज ठाकरे यांना कोणताही फायदा होणार नाही, असे सांगितले होते. आकड्यांकडे पाहता फडणवीसांचे भाकित खरे ठरल्याचे दिसते.

मी अगोदरच सांगितलं होतं की…

याच भाकिताविषयी विचारले असता, फडणवीस म्हणाले की, मी अगोदरच सांगितलं होतं की मनसेला त्या युतीचा फायदा होणार नाही. त्या युतीमध्ये सर्वात मोठे अपयश हे मनसेला येईल, असे मी म्हणालो होतो. माझं भाकित या निवडणुकीत खरं ठरलं आहे. मनसेला किंवा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीला फायदा झालेला नाही. यासह उद्धव ठाकरे यांना मात्र राज ठाकरेंसोबतच्या युतीचा फायदा झालेला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...