AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation| ‘भुजबळ बोलायला हुशार!’ फडणवीस म्हणतात, भुजबळांनी बोलता बोलता टोमणेही मारले

ओबीसी आरक्षणाचा राज्य सरकारचा अंतरिम अहवाल काल सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला. त्यानंतर आज विधीमंडळात राज्य सरकार आणि विरोधी पक्ष नेत्यांमध्ये अशी खडाजंगी पहायला मिळाली.

OBC Reservation| 'भुजबळ बोलायला हुशार!' फडणवीस म्हणतात, भुजबळांनी बोलता बोलता टोमणेही मारले
| Updated on: Mar 04, 2022 | 12:14 PM
Share

मुंबईः विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. सभागृहात सुरुवातीला बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय एकही निवडणूक घेऊ नका, अशी मागणी केली. येत्या काळात दोन तृतीयांश निवडणुका होणार आहेत. या निवडणुका पार पडल्या तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली. त्याला उत्तर देताना छगन भुजभळ यांनी फडणवीसांना आवाहन केलं की तुमच्याकडे काही नेते आणि आमच्याकडचे काही नेते एकत्र येऊन या विषयावर मार्ग काढू. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना टोमणा मारला. भुजबळ बोलायला हुशार, पण एकत्र राहुयात हे बोलता बोलता एक दोन टोमणेही मारले, असं फडणवीस म्हणाले. ओबीसी आरक्षणाचा राज्य सरकारचा अंतरिम अहवाल काल सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला. त्यानंतर आज विधीमंडळात राज्य सरकार आणि विरोधी पक्ष नेत्यांमध्ये अशी खडाजंगी पहायला मिळाली.

छगन भुजबळ काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावर केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ओबीसींचा अहवाल तयार करताना काही काही गोष्टी राहून गेल्या, मी मान्यही केल्या. टेक्निकल गोष्ट राहून गेल्या तारीख वगैरे.. मी मान्य करतो. आदर करतो सुप्रीम कोर्टाचा. राज्यात काही नगरपालिका ओव्हरड्यू झाल्यात. झेडपी एकही ओव्हरड्यू झालेली नाही.. फडणवीसजी, तुम्ही दोघं तिघं आणि आमच्याकडे एखादं दोन लोकं असे मिळून ओबीसींच्या अहवालावर काम करूयात. आम्ही सभागृहात एकमेकांवर चिखलफेक करणार नाही, उणीदुणी काढणार नाहीत. देशाला दाखवून देऊया आपण ओबीसी आरक्षणासाठी एक आहोत. कोण कुठं काय काय बोललं हे सगळं आहे माझ्याकडे.. पण मला असं वाटतं की आपण शांतपणे बसून यावर मार्ग काढला पाहिजे… केवळ दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा वाचवा हा शब्द आहे, तो बुडवा हा शब्द होईल असं करु नका…असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.

फडणवीस म्हणाले, भुजबळ बोलायला हुशार!

मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्याला प्रतिसाद देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘तुम्ही बोलायला इतके हुशार आहात की एकत्रित राहुयात हे बोलता बोलता एक दोन टोमणे तुम्ही मारुन दिलेत…पण आमचं समाधान झालेलं नाही.. सभागृहात चर्चा नाही करायची तर मग कुठं करायची, हेच सांगितलं नाही.

इतर बातम्या-

Ukraine crisis : शेअर बाजार कोसळला, कच्च्या तेलाचे दर गेल्या 8 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर, सोनंही महागलं

तुमचा ‘वाचवा’ शब्द आहे, तो ‘बुडवा’ होईल असं करू नका; भुजबळांचे फडणवीसांना शेलके आवाहन

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.