5

भंडाऱ्याच्या हलगर्जीपणाच्या चौकशीची फडणवीसांची मागणी, पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांना मृत्यू झाल्यांनतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून त्याची तत्काळ चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (Devendra Fadnavis Bhandara hospital fire)

भंडाऱ्याच्या हलगर्जीपणाच्या चौकशीची फडणवीसांची मागणी, पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक
लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं.
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 10:43 AM

मुंबई : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाल्यांनतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत त्याची तत्काळ चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केली आहे. तसेच बालकं दगावलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगत दोषींवर कठोर कारवाईचीही त्यांनी मागणी केलीये. (Devendra Fadnavis demands detailed probe of Bhandara hospital fire incident)

“भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून 10 बालकांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दु:खदायक आणि व्यथित करणारी आहे. या घटेनमध्ये बळी ठरलेल्या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या घटनेची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसेच दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जखमी झालेले बालकं लवकर बरे व्हावेत : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा भंडार जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी बाळं दगावलेल्या कुटुंबांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत जखमी झालेले बलकं लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.

राष्ट्रपतींकडून शोक

रुग्णालयातील या आगीमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेची दखल घेतली आहे. भंडारा जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत विदारक असून बाळ गमावलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.

आरोग्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच संध्याकाळी 5 वाजता आरोग्यमंत्री स्वत: भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य बाळांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुर्घटनेत 3 बाळांचा होरपळून तर 7 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

Bhandara Hospital Fire | 10 नवजात बालकांचा मृत्यू, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे?

Bhandara District hospital fire | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली

(Devendra Fadnavis demands detailed probe of Bhandara hospital fire incident)

Non Stop LIVE Update
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस