AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही गोष्ट करू नका थेट मुख्यमंत्री होता येतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमातच सांगून टाकलं

स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेतला पाहिजे, आपल्या देशासोबत युद्ध होत नाही म्हणून पाकिस्तान अमली पदार्थ पाठवून व्यसनाधीन करत आहे. असं सांगत असतांना फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

ही गोष्ट करू नका थेट मुख्यमंत्री होता येतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमातच सांगून टाकलं
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 31, 2022 | 12:46 PM
Share

बीड : दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसणमुक्ती कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणा दरम्यान व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात मोठं विधान केले आहे. व्यसन नाही केलं तर माणूस मुख्यमंत्री बनतो असं म्हंटल्याने कार्यक्रमाला जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत केले जात असतांना तळीरामांकडून पार्ट्या केल्या जातात. वेगवेगळ्या स्वरूपाची नशाही केली जाते. त्यामुळे याच काळात नागरिकांनी व्यसनापासून दूर व्हावे याकरिता विनायक मेटे यांनी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आयोजन करण्यास सुरूवात केली. हाच उपक्रम त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही सुरूच ठेवला आहे. याच कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण झाली होती. त्यांना नमन करत स्वर्गीय विनायक मेटे यांना आदरांजली वाहिली होती.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2015 साली मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम करायचा संकल्प केला, 31 डिसेंबर रोजी दारू आणि इतर व्यसनाची पार्टी केली जाते.

चरश गांजा ओढण्याचा प्रयत्न करतात, म्हणून दारू नाही तर मसाला दूध घेतले पाहिजे, ही संकल्पना विनायक मेटे यांची होती.

आज कार्यक्रमाला आलो मात्र दुर्दैवाने मेटे साहेब नाहीत, ज्योतीताई मेटे यांनी मला फोन करून निमंत्रन दिलं, हा वसा तुम्ही पुढ नेताय म्हणून या कार्यक्रमाला आलोय.

व्यसन नाही केलं तर माणूस मुख्यमंत्री बनतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत विनायक मेटे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ताकतीने शिवसंग्राम च्या मागे राहणार असल्याचे म्हंटले आहे.

स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेतला पाहिजे, आपल्या देशासोबत युद्ध होत नाही म्हणून पाकिस्तान अमली पदार्थ पाठवून व्यसनाधीन करत आहे.

दारूने संसार उद्धवस्त होत आहेत, सिगारेट तंबाखू ही स्टाइल झाली आहे, हे करताना आपण नट दिसतो असे प्रत्येकाला वाटते आहे, हळूहळू भारत कॅन्सर ची राजधानी होत आहे.

पान बिडी तंबाखू अमली पदार्थ कुठलाही व्यसन करू नका, क्रांतिकाराना भारत माता स्वतंत्र करण्याचा व्यसन होते, दारू पिऊन आल्यानंतर फार मोठी ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दोन फाईट पडल्यावर ते धारशिवी पडतात.

चार हजार कोटींची अमली पदार्थ पकडून आम्ही जाळून टाकले आहे, अवैध दारू, गुटख्या संबंधी पोलिसांना आदेश दिले असल्याचे सांगत फडणवीस यांच्याकडून व्यसन मुक्तीची सामूहिक शपथही यावेळी देण्यात आली.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...