AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं! शेतकरी कर्जमाफीबाबत सर्वात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीसांनी दिली सभागृहातच खुशखबर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अॅग्री स्टॅक तयार केला जातोय, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

ठरलं! शेतकरी कर्जमाफीबाबत सर्वात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीसांनी दिली सभागृहातच खुशखबर
DEVENDRA FADNAVIS Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 26, 2026 | 3:28 PM
Share

Devendra Fadnavis : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केलेल आहे. अवकाळी पाऊस, शेतकरी कर्जमाफी, भ्रष्टाचाराची प्रकरणं या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून विरोधक फडणवीस सरकारला खिंडीत गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरं देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. आज (26 फेब्रुवारी) राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, तसेच या कर्जमाफीसाठी सरकार काय-काय तयारी करत आहे, याबाबतही त्यांनी सांगितले आहे.

तकऱ्यांना 15472 कोटी रुपयांची थेट मदत

विधानसभेत बोलताना, मागच्या वर्षी शेतकऱ्यांवर जे संकट आलं त्यावेळी आपण शेतकऱ्यांना 15472 कोटी रुपयांची थेट मदत केली. हे पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पोहोचले. हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून दिलेले आहेत. शेतकरी जिथे अडचणीत आहेत, तिथे सरकार उभे आहे, असे अश्वासन फडणवीस यांनी दिले.

शेतीचा केला जातोय डिजिटल रेकॉर्ड

तसेच, कर्जमाफीबाबत बोलताना, आम्ही एक समिती तयार केलेली आहे. या समितीचा अहवाल अपेक्षित आहे. कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही जे आश्वासन दिलेले आहे ते आम्ही योग्य वेळी पूर्ण करणारच आहोत, असे फडणवीस म्हणाले. मागच्या अनेक कर्जमाफींमध्ये आम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. बँका चुकीच्या पद्धतीने खात्यांची माहिती देतात. जुने बँक खाते काढून सरकारकडून पैसे घेतात. ही फसवणूक रोखण्यासाठी शंभर टक्के अॅग्री स्टॅक तयार करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. आपण शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहोत. या रेकॉर्डमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, सातबाराचा अहवाल यांची यात नोंद असेल. हा डिजिटल रेकॉर्ड, आधार क्रमांक या सर्व गोष्टी एकत्रित ठेवून कर्जमाफीबाबत विचार केला जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात उभ राहिले होते आंदोलन

दरम्यान, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाकाळी गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत सरकार 2026 सालाच्या जून महिन्यात कर्जमाफी करेल, असे आश्वासन फडणवीस सरकारने दिले होते. त्यामुळे आता भविष्यात कर्जमाफीचे स्वरुप कसे असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...