AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे-भाजपची युती पक्की?; देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ विधानाने चर्चा

उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत छापून आली आहे. या मुलाखतीत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यावर काय टीका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसे-भाजपची युती पक्की?; देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' विधानाने चर्चा
Devendra FadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2024 | 12:42 PM
Share

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. तर महायुतीत चार प्रमुख पक्ष आहेत. महायुतीत अजित पवार आल्यानंतर मनसेही महायुतीत सामील झाला आहे. महायुतीत येऊन राज ठाकरे एकही जागा लढवत नाहीये. मात्र, असं असलं तरी भाजप आणि मनसेची युती ही फक्त लोकसभेपुरती मर्यादित राहणार नसून ती विधानसभेतही राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तसं विधान केल्याने त्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी मनसेसोबत विधानसभेतही युती कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्ही लोकसभेत मनसेला जागा देऊ शकलो नाही. कारण महायुतीत आम्ही तीन पक्ष होतो. जागा फक्त 48 होत्या. त्यामुळे मनसेला जागा देता आल्या नाहीत. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा विचार करण्यात येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती आता फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित राहणार नसून ही युती आता विधानसभेतही कायम राहणार आहे. या निमित्ताने भाजपला एक मित्र पक्षही मिळाला आहे.

राज ठाकरे यांचा सभांवर जोर

मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या महायुतीसाठी सभा झाल्या नव्हत्या. त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीसाठी सभा घेणार की नाही? अशी चर्चा होती. पण राज ठाकरे यांनी पहिली सभा नारायण राणे यांच्यासाठी तळकोकणात घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातही महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेतली. राज ठाकरे आज ठाण्यात सभा घेणार आहेत. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी राज ठाकरे कळव्यात सभा घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे मुलाखत

उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत छापून आली आहे. या मुलाखतीत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यावर काय टीका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय राज ठाकरे यांनी सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं असं आवाहन केलं आहे. या आवाहनाला विरोधक फतवा म्हणत आहेत, त्यावरही राज ठाकरे भाष्य करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!