Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण शिवाजी पार्कवरचं, देवेंद्र फडणीसांचा खोचक टीका

या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दोन भाषणं केली. पहिलं भाषण शॉर्ट होतं. तर आजचं भाषण शिवाजी पार्कवरचं भाषण होतं, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण शिवाजी पार्कवरचं, देवेंद्र फडणीसांचा खोचक टीका
मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण शिवाजी पार्कवरचं, देवेंद्र फडणीसांचा खोचक टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 7:09 PM

मुंबई: या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दोन भाषणं केली. पहिलं भाषण शॉर्ट होतं. तर आजचं भाषण शिवाजी पार्कवरचं भाषण होतं, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली. विधानसभा अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे नवाब मलिकांची (nawab malik) बाजू घेतात हे मोठं दुर्देव आहे. सत्तेसाठी आणि मतांसाठी शिवसेनेला काहीही करावं लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. संपूर्ण अधिवेशनात कोणत्याही विषयाला हे सरकार उत्त देऊ शकलं नाही. पालिकेपासून विविध विभागातील भ्रष्टाचाराचं उत्तर या सरकारला देता आलं नाही. या अधिवेशनात कोणताही मोठा निर्णय घेण्यात आला नाही. जनतेला कोणताही दिलासा दिलेला नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.

अधिवेशनाच्या सुरुवातीला आम्ही आघाडीचा कत्तलखाना सीडीच्या माध्यमातून समोर आणला. कशाप्रकारे आमच्याविरोधात सरकारचे वकील आणि मंत्री कटकारस्थान करत आहेत त्याचा जिवंत पुरावा दिला. त्यामुळे सरकार हादरलं. त्यांनी सीआयडी चौकशी लावली. या प्रकरणावर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न आहे. आम्हाला ते मान्य नाही. म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आहे, सीबीआय चौकशी मागितली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

उशिरा शहाणपण सूचलं

आम्ही शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात आवाज उठवला. सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर सरकारने वीज कनेक्शन तोडणार नसल्याचं जाहीर केलं. वीज कनेक्शनचं शहाणपण आधीच आलं असतं तर शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालं ते झालं नसतं. त्यामुळे सूरज जाधव या शेतकऱ्यांला आत्महत्या करावी लागली नसती, असं ते म्हणाले.

मराठवाडा, विदर्भासाठीचा खर्च कागदावरच

हे सरकार विदर्भ, मराठवाड्यासाठी तरतुदी करते. पण त्या सर्व कागदावरच असतात. तरतूदी करायच्या पण खर्च करायचा नाही ही सरकारची मोड्स ऑपरेंडी आहे. आम्ही सातत्याने मराठवाडा, विदर्भासाठी किती खर्च करण्यात आला हे विचारत होतो. मात्र त्यावर सरकार काहीच उत्तर देत नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Ajit Pawar : उत्तर महाराष्ट्राच्या एकाचा मुख्यमंत्रीपदाचा चान्स गेला, दुसरा तयार होत होता, फडणवीसांकडे बघत अजित पवारांकडून हसत हसत फिरकी

Devendra Fadnavis: ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? मुख्यमंत्र्यांच्या फटकेबाजीवर फडणवीसांचं कडक उत्तर

Corona 4th Wave | ..चौथ्या लाटेची नांदी? ‘डेल्टाक्रॉन’ व्हेरियंटचा महाराष्ट्रात फैलाव, जाणून घ्या, लक्षणं नेमकी काय आहेत?

Non Stop LIVE Update
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.