रस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस यांनी गाडीला रस्ता नाही, गावाचा प्रमुख रस्ता वाहून गेला म्हणून भेटीसाठी ताटकळत बसलेल्या ग्रामस्थांशी ओढा ओलांडून संवाद साधला.

रस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला

बारामती : अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, अशी परिस्थिती असताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस चिखल-गाळ तुडवत ओढ्यातून वाट काढत नुकसानग्रस्तांच्या भेटीला गेले. फडणवीस हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात ओढा ओलांडून फडणवीसांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. (Devendra Fadnavis visits Swami Chincholi village in Daund by crossing water flow)

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर असताना गावकऱ्यांना प्रशासनाकडून रस्त्यावर बोलावून घेतलं जात आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीला रस्ता नाही, गावाचा प्रमुख रस्ता वाहून गेला म्हणून भेटीसाठी ताटकळत बसलेल्या ग्रामस्थांशी ओढा ओलांडून त्यांच्यापर्यंत पोहचून संवाद साधला.

फडणवीस आधी अलिकडे थांबून गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आवाज पोहचत नव्हता. बराच वेळ गावकरी ताटकळत राहिल्याने त्यांनी ओढ्यातून पलिकडे जाण्याचा निर्णय धेतला.

दौंड तालुक्यातील शेवटच्या गावात म्हणजे स्वामी चिंचोलीत डांबरी रस्ता अतिवृष्टीत वाहून गेला. फडणवीसांनी ओढा पार करुन गावकऱ्यांशी संवाद साधला. गाडी जात नाही म्हणून मुख्यमंत्री गावकऱ्यांना रस्त्यावर बोलावून घेतात तर माजी मुख्यमंत्री गाडीला रस्ता नाही म्हणून नदी ओलांडून लोकांपर्यंत पोचतात, अशी चर्चा यावेळी गावकऱ्यांमध्ये रंगली होती.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे, असं सांगतानाच विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना उद्धव ठाकरे सतत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करायचे. आता ईश्वराने त्यांना मदत देण्याची शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

संबंधित बातम्या :

आता ईश्वराने मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत देण्याची शक्ती दिलीय, तातडीने मदत द्या: फडणवीस

राज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का?; फडणवीस संतापले

(Devendra Fadnavis visits Swami Chincholi village in Daund by crossing water flow)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *