AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धाड..धाड…धाड…धनंजय मुंडेंकडून गोळीबार, कार आडवी लावून…धनंजय देशमुखांच्या आरोपाने मोठी खळबळ!

माझ्यासमोर गाडी आडवी लावून धनंजय मुंडे यांनी हवेत दोन राऊंड फायर केले असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.

धाड..धाड...धाड...धनंजय मुंडेंकडून गोळीबार, कार आडवी लावून...धनंजय देशमुखांच्या आरोपाने मोठी खळबळ!
| Updated on: Jun 01, 2026 | 5:12 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे चर्चेत आहेत. त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता संतोष देशमुख यांनी राज्यात खळबळ उडून देणारा गंभीर आरोप केला आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी कार आडवी लावून हवेत दोन राउंड फायर केले असा धक्कादायक दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.

धनंजय देशमुख यांनी पिस्तूल लावून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप करत समाधान खिंडकर याने तक्रार दिली होती. त्या आधारे बीड ग्रामीण पोलिसांनी धनंजय देशमुख यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की अशी कुठलीही घटना घडली नाही. आम्ही पोलिसांना सांगत होतो, गुन्हा दाखल करण्यापूर्वी शहानिशा करा. मात्र पोलिसांनी माझ्याविरुद्ध 48 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीच्या म्हणण्यावरून थेट 307 चा गुन्हा दाखल केला. मात्र माझ्यासोबत देखील अशीच घटना घडली आहे.

तो गुन्हा खोटा

पुढे ते म्हणाले, धनंजय मुंडे यांनी स्वतः माझ्या समोर गाडी आडवी लावली आणि हवेत दोन फायर केले. धनंजय देशमुखांनी पुढे सांगितले की आपण फिर्याद देत असून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. यानंतर आयपीएस दर्जाचे अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि धनंजय देशमुख यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात तब्बल सात तास चौकशी केली. त्यानंतर तपास देखील करण्यात आला. सीसीटीव्ही आणि काही लोकांचे जबाब नोंदवल्यानंतर अशी घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. नंतर प्राथमिक चौकशीत धनंजय देशमुख यांच्याविरुद्धचा गुन्हा खोटा असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. पुढे धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार समाधान खिंडकर यांनी धनंजय देशमुख यांनी आपल्या अंगरक्षकाचे पिस्तूल काढून माझ्या डोक्यावर ठेवले आणि मला धमकावले तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केलेला. खिंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात धनंजय देशमुख यांच्याविरुद्ध बीडमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज/डीव्हीआर जप्त केले. पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले.

Follow Us
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...
नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित!
नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित!.
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक...
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक....