मुस्लीमधर्मीय मेहतर सफाई कामगारांच्या सेवा संरक्षित करण्यासाठी लवकरच निर्णय, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेची ग्वाही

मुस्लीमधर्मीय मेहतर भंगी समाजातील सफाई कामगारांच्या सेवा संरक्षित करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आगामी मंत्रीमंडळ बैठकीत विषय सादर करु, तसंच या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

मुस्लीमधर्मीय मेहतर सफाई कामगारांच्या सेवा संरक्षित करण्यासाठी लवकरच निर्णय, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेची ग्वाही
धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 8:26 PM

मुंबई : राज्यातील मुस्लीमधर्मीय मेहतर समाजातील सफाई कामगारांना वारसा हक्काने शासन सेवेत नियुक्ती देताना अनेक अडचणी आहेत. मुस्लीमधर्मीय मेहतर भंगी समाजातील सफाई कामगारांच्या सेवा संरक्षित करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आगामी मंत्रीमंडळ बैठकीत विषय सादर करु, तसंच या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मंत्रालयातील दालनात राज्यातील मुस्लीमधर्मिय मेहतर समाजातील सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते. (Dhananjay Munde promises to take important decision soon for Muslim mehtar Sweepers)

मुंडे म्हणाले, सफाई कामगारांच्या वारसा हक्क प्रकरणात नियुक्ती देताना विविध प्रशासकीय विभाग व आस्थापनांना अडचणी आहेत. विविध संघटनांच्या मागण्या आणि लाड समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत यापूर्वी काढलेल्या शासन निर्णयांचे एकत्रीकरण करून सर्वसमावेशक बांबीसंदर्भात तातडीने सुधारित निर्णय घेण्याच्या सुचनाही या बैठकीत करण्यात आल्या. यावेळी मेहतर समाज विकास महासमितीचे अध्यक्ष शकील बेग यांनी या समाजातील सफाई कामगारांच्या वारसा हक्काने मिळणाऱ्या नियुक्तीतील अडचणी आणि इतर समस्यांचे निवेदन बैठकीत सादर केले.

केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रस्ताव त्रुटी दूर करून तात्काळ सादर करावेत

केंद्र पुरस्कृत दिनदयाळ दिव्यांग पुनवर्सन योजना (DDRS),दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव आणि साधने पुरवणं तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी सेवासुविधा पुरवणे (SIPDA) या तिन्ही योजनांचे 2018 -19, 2019-20 व 2020-21 या आर्थिक वर्षातील संपूर्ण कार्यवाही विहीत वेळेत करावी. तसेच कोविड-19 मुळे प्रलंबित असलेली प्रस्तावांबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना धनंजय मुंडे यांनी केलीय.

मंत्रालयातील दालनात केंद्र पुरस्कृत योजनांबाबत धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे, दिव्यांग कल्याण विभागाचे सहसचिव अ.प्रा.अहिरे , विजय कान्हेकर यावेळी उपस्थित होते.

अनुदानीत वसतीगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबतही निर्णय घेणार

अनुदानीत वसतीगृहातील कर्मचारी सामाजिक न्याय विभागाचेच कर्मचारी आहेत त्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढू व सामाजिक न्याय विभागामार्फत त्यांच्या वेतनासंदर्भाबाबत उच्चस्तरीय समितीकडेही आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

वैदू समाजाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी कार्यवाही करावी

वैदू समाज हा एकाच ठिकाणी स्थायिक नसल्यामुळे लोकांकडे 1961 पूर्वीचे पुरावे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे त्यांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्रे मिळत नाहीत त्यामुळे अशा समस्या ज्या ठिकाणी आहेत तिथे सामाजिक न्याय विभागाने वैयक्तीक रित्या संबधित अधिका-यांना पाठवून या समस्यांचे निराकरण करावे तसेच भविष्यात जात दाखले देताना सामाजिक न्याय विभाग अनेक सुधारणा करणार असल्याचेही यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत सांगितले.

इतर बातम्या :

शेतकऱ्यांना डाळींचा हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, पाशा पटेल यांचं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना साकडं

औरंगाबाद प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे,अतिरिक्त निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, उद्धव ठाकरेंचे निर्देश

Dhananjay Munde promises to take important decision soon for Muslim mehtar Sweepers

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.