करुणा शर्माकडूनच धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचार?; मुलगा शिशीवची पोस्ट काय?
धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी द्यावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र आता याप्रकरणी एक मोठा ट्वीस्ट आला आहे. धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशीव मुंडेने त्याची आई करुणा शर्मावर गंभीर आरोप केले आहेत.

आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. यासाठी गेल्या काही दिवसापासून करुणा शर्मा या कायदेशीर लढाई लढत आहेत. आज वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने याप्रकरणी मोठे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी द्यावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र आता याप्रकरणी एक मोठा ट्वीस्ट आला आहे. धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशीव मुंडेने त्याची आई करुणा शर्मावर गंभीर आरोप केले आहेत.
शिशीव मुंडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने मोठमोठे खुलासे केले आहेत. यात त्याने करुणा शर्माकडूनच माझे वडील धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचार व्हायचे असा आरोप केला आहे.
शिशीव मुंडेंने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
“मी, शिशीव धनंजय मुंडे आणि आता मला असं वाटतंय की मी प्रसारमाध्यमांशी बोलावं. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण माझं कुटुंब हा सध्या एक मनोरंजनाचा विषय बनवला जात आहे.
माझे वडील हे कधीच सर्वोत्तम नव्हते. पण ते आमच्यासाठी कधीही घातकही नव्हते. पण माझी आई त्याउलट होती. तिला मानसिक आघात व्हायचे आणि त्यातून बाहेर पडण्याचे तिचे मार्ग खूपच वाईट होते. ती आम्हाला त्रास द्यायची. ती आता ज्या घरगुती हिंसाचाराबद्दल बोलत आहे तो ती माझ्यासोबत, माझ्या बहिणींसोबत आणि माझ्या वडिलांसोबतही करायची. माझ्या वडिलांनी तिला सोडल्यानंतर तिने आम्हाला घर सोडायला सांगितलं. कारण तिच्यासाठी आमचं अस्तित्व नव्हतं.
माझे वडील २०२० पासून आमची काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही. तिने मुद्दाम घराच्या कर्जाचे हफ्ते भरलेले नाहीत आणि आता ती माझ्या वडिलांविरुद्ध काल्पनिक कथा रचत आहे. ती हे सर्व फक्त सूड घेण्यासाठी करत आहे”, असे शिशीवने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
कोर्टाच्या आदेशात नेमकं काय?
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम देखभालीसाठी रक्कम देण्याबाबत आहे. जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे. कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतः ते करुण शर्मा आणि मुलं यांच्याबरोबर लिव्ह इनमध्ये असल्याची यापूर्वीच कबुली दिली आहे, तोच या आदेशाचा आधार आहे.