AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजीनामा द्या…’ फडणवीस यांचे कालच धनंजय मुंडेंना आदेश, कान उघाडणीही केली; कालच्या बैठकीतील इन्साईड स्टोरी समोर

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलले आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. प्रारंभीपासूनच देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते.

'राजीनामा द्या...' फडणवीस यांचे कालच धनंजय मुंडेंना आदेश, कान उघाडणीही केली; कालच्या बैठकीतील इन्साईड स्टोरी समोर
| Updated on: Mar 04, 2025 | 7:37 PM
Share

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, या फोटोमुळे राज्यभरात तीव्र संतापाची लाट आहे. त्यानंतर अखेर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कालच धनंजय मुंडे यांंना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठली. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांची अर्धा तास बैठक पार पडली. ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी पोहचले होते, आणि त्यानंतर या सर्व नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची कानउघाडनी देखील करण्यात आली होती अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यानंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलले आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. प्रारंभीपासूनच देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. मात्र धनंजय मुंडे यासाठी तयार नव्हते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार यांनी घ्यावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान त्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज आपला राजीनामा दिला आहे, राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला देखील आहे.

राज्यात संतापाची लाट 

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले. आरोपींनी अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली. हे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. वातावरण चांगलंच तापलं आहे. आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?