Dhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करु : गोपीचंद पडळकर

धनगर समाज बांधवानी आरक्षणासाठी  (Dhangar reservation protest Maharashtra) आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 'ढोल बजाव, सरकार जगाव' आंदोलन करण्यात येत आहे.

Dhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करु : गोपीचंद पडळकर

पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता धनगर समाज बांधवानी आरक्षणासाठी  (Dhangar reservation protest Maharashtra)आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. धनगर समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करुन आदिवासी समाजाच्या सवलती तातडीने लागू कराव्यात, अशी धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी आज पंढरपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या नेतृत्वाखाली ‘ढोल बजाव, सरकार जगाव’ हे आंदोलन करण्यात येत आहे.

ढोल वाजवून जर सरकारला जाग आली नाही, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

इकडे सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चामध्ये धनगर बांधव ढोल वादन करत मोर्चा काढत आहेत.

धनगर आंदोलन राज्यभर विविध ठिकाणी होत आहे. राज्यभरातील ग्रामपंचायत, नगर पालिका , मंदिर , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होईल, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. मी स्वतः पंढरपूर येथे आंदोलनात सहभागी होत आहे, असं पडळकर म्हणाले.

तुळजाभवानी चरणी गोंधळ
दरम्यान, दोन दिवसापूर्वी मल्हार सेनेच्यावतीने तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या महाद्वारासमोर संबळ वाजवून आरक्षणाची ज्योत पेटवली. धनगर समाजाला तात्काळ आरक्षणात सामावून घ्यावं या मागणीसाठी तुळजाभवानी चरणी गोंधळ घालत आरक्षणाची मशाल पेटवण्यात आली.

धनगर समाजाला अनुसूचित जमातींचे सर्व लाभ

धनगर समाजाचा (Dhangar Reservation) अनुसूचित जमातींमध्ये (ST) समावेश करण्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे. मागील वर्षी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत, अनुसूचित जमातींमधील सर्व सवलती धनगर समाजाला (Dhangar Reservation) लागू केल्या आहेत.

महाराष्ट्रात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना 22 योजना दिल्या जातात, त्या धनगर समाजातील नागरिकांनाही लागू आहेत.

धनगर आरक्षण
महाराष्ट्रात सध्या धनगर समाजाला NT अंतर्गत आरक्षण आहे. मात्र धनगर समाजाने अनुसूचित जमातींमध्ये (ST) समावेश करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. “धनगर आरक्षणाचा मुद्दा हा राज्याच्या नाही तर केंद्राच्या अखत्यारित येतो. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा” अशी मागणी धनगर समाजाने सातत्याने केली.

धनगर-धनगड
राज्यातील धनगर समाजाची एकच मागणी आहे. ते म्हणजे धनगर’र’ चे धनग’ड’ झालं पाहिजे. धनगर समाजाच्या विविध मागण्या, समस्यांसह टीस अहवालाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी मंत्रिमंडळ उपसमितीची नियुक्ती केली होती.

(Dhangar reservation protest Maharashtra)

संबंधित बातम्या

सरकारचा मोठा निर्णय, धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू    

धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *