AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : आठवड्याभरात शरद पवार यांना दुसरा मोठा धक्का, आधी भाजप नंतर जवळच्या मित्र पक्षानेच दिला दगा

Sharad Pawar : नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरु आहेत. यात मित्रपक्ष आपल्या सहकारी पक्षाला धक्का देत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही याला अपवाद नाहीत. आता शरद पवार यांना आठवड्याभरात दुसरा झटका बसला आहे.

Sharad Pawar : आठवड्याभरात शरद पवार यांना दुसरा मोठा धक्का, आधी भाजप नंतर जवळच्या मित्र पक्षानेच दिला दगा
Sharad Pawar
| Updated on: Nov 14, 2025 | 2:16 PM
Share

आठवड्याभरात शरद पवार यांना दुसरा मोठा धक्का बसला आहे. आधी भाजपने त्यांना झटका दिला होता. नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. त्याआधी मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरु आहे. खासकरुन महाविकास आघाडीमधले नेते, पदाधिकारी, सत्ताधारी महायुतीमध्ये प्रवेश करतायत. आता महाविकास आघाडीतील पक्षानेच शरद पवार यांना धक्का दिला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या काळात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसने दिला. धाराशिव मधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दोन वेळा तुळजापूर विधानसभा लढविलेले अशोक जगदाळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. जगदाळे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नळदुर्ग नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार असल्याचा निर्धारही जगदाळे यांनी बोलून दाखवला आहे.

फॉर्म्युला काय ठरलाय?

काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अशोक जगदाळे यांनी, नळदुर्ग नगरपालिका निवडणूक भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असं जाहीर केलय. काँग्रेस नगराध्यक्ष पदासह 18 जागा तर शिवसेना उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 1 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी ही मोठी खेळी

दोन-तीन दिवसांपूर्वी सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला होता. सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाच माजी नगरसेकांनी भाजपत प्रवेश केला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी ही मोठी खेळी आहे. सोलापूरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचा मुलगा प्रथमेश कोठे यांच्यासह पूर्ण गटाने भाजपमध्ये प्रवेश केला.

पाच माजी नगरसेवक फोडले

भाजपने शरद पवार गटाचे पाच माजी नगरसेवक फोडले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.