AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, सरकारला…

मोठी बातमी समोर येत आहे, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, सरकारला...
sanjay raut Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 25, 2026 | 3:53 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणात सातत्याने कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. गेल्या महिनाभरापासून दिल्लीमधील जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू होतं.  धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांनी संसदेवर देखील मोर्चा काढला.

दरम्यान या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले होते. या आंदोलनानंतर तर वातावरण आणखी तापलं होतं. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही येत्या 26 तारखेला याहीपेक्षा मोठा मोर्चा काढू असा इशारा दिपके यांनी दिला होता. परंतु त्याआधीच आता धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत?

त्यांच्या आंदोलनाला परदेशातून पैसै येतायेत, अशा प्रकराच्या बातम्या पेरल्या गेल्या, आम्ही हे आंदोलन चिरडून टाकू, अशा प्रकराच्या प्रतिक्रिया सरकारमधून येत होत्या. 12 वर्षांनंतर एक असं आंदोलन झालं. ज्यामुळे केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. लोकशाही या देशात मृतप्राय झाली होती. लोकशाहीला जीवदान देणारी ही आजची घटना आहे, त्यामुळे तरुण वर्गाचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं, देशभरात आंदोलन झालं. फक्त दिल्लीत झालं का तर नाही, तर संपूर्ण देशभरात आंदोलन झालं. पुणे, मुंबईमध्ये देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन पहायला मिळालं, आणि त्यानंतर हा राजीनामा झाला. सरकारला उशिरा का होईल जाग आली, त्यासाठी अनेक तरुण तरुणींना आपलं रक्त सांडाव लागलं, हाडं मोडून घ्यावी लागली, असं राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान फडणवीस यांना केंद्रात शिक्षण मंत्रिपद मिळू शकतं असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या...
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...