Dhule Fire : धुळ्यात झोपडी जळाल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यू

नागरिकांनी तात्काळ अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली. मात्र झोपडीत झोपलेला तीन वर्षाचा चिमुकला वाचू शकला नाही. आगीत होरपळून चिमुकल्याचा दुर्दैवी झाला.

Dhule Fire : धुळ्यात झोपडी जळाल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यू
धुळ्यात झोपडी जळाल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 3:59 PM

धुळे : झोपडीला आग (Fire) लागल्याने आत झोपलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचा आगीत होरपळून मृत्यू (Death) झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना शिंदखेडा तालुक्यात पढावद शिवारात घडली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या बालकाच्या मोठ्या बहिणाने आरडाओरडा केला असता नागरिकांनी झोपडीकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. नागरिकांनी तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण केले. अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवली. मात्र चिमुकल्याचा जीव वाचवता आला नाही. दरम्यान आग नेमकी कशी लागली हे अद्याप कळू शकले नाही. (A three-year-old boy has died in a fire at a hut in Dhule)

बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले

मयत चिमुकल्याची आई शेतात मजुरीचे काम करते. नेहमीप्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या दोन मुलांना घरी एकटे सोडून महिला शेतात मजुरीसाठी गेली होती. यावेळी तीन वर्षाचा चिमुरडा झोपडीत झोपला होता. तर त्याच्यापेक्षा मोठी असलेली त्याची बहिण घराबाहेर खेळत होती. अचानक झोपडीला आग लागल्याचे पाहताच बाहेर खेळत असलेल्या मुलीने गावाच्या दिशेने धाव घेतली आणि लोकांना या घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी पेटत्या झोपडीकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. आगीने रौद्र रुप धारण केले होते.

अग्नीशमन दलाने तात्काळ दाखल होत आग विझवली

नागरिकांनी तात्काळ अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली. मात्र झोपडीत झोपलेला तीन वर्षाचा चिमुकला वाचू शकला नाही. आगीत होरपळून चिमुकल्याचा दुर्दैवी झाला. झोपडीमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याला लहान मुलीसोबत एकटं सोडून मजुरी करण्यासाठी जाणं आईला चांगलच महागात पडलं आहे. (A three-year-old boy has died in a fire at a hut in Dhule)

इतर बातम्या

Bhandara Crime | भंडाऱ्यातील पोहऱ्यात अज्ञात व्यक्तीची दहशत, रात्रभर लाठ्या काठ्या घेऊन द्यावा लागतो पहारा

Nanded Crime | दोन तलवारी हातात घेत सोशल मीडियावर भाईगिरी, तरुणासह आई वडिलांनाही अटक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.