Dhule Suicide : एसटीमधील घंटी वाजवायच्या दोरीने गळफास घेत बस चालकाची आत्महत्या! धुळे बस स्थानकातील खळबळजनक घटना

Dhule Suicide News : हिरामण देवरे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

Dhule Suicide : एसटीमधील घंटी वाजवायच्या दोरीने गळफास घेत बस चालकाची आत्महत्या! धुळे बस स्थानकातील खळबळजनक घटना
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 6:50 AM

धुळे : एसटी बसमध्ये घंटी वाजवायच्या दोरीच्या मदतीने एकाने गळफास (ST Driver Suicide) घेतल्यानं खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे एसी बस स्थानकातच (Dhule ST Bus Depot) ही घटना घडली. यानंतर तातडीनं पोलिसांना (Dhule Suicide News) याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी या घटनेती गंभीर दखल घेत लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील मृतदेह ताब्यात घेत अधिक तपास सुरु केला. त्याचप्रमाणे एसटी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर आत्महत्या केलेली व्यक्ती एसटी बसचा चालक होती, हेही स्पष्ट झालं. त्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आत्महत्येची ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण बस स्थानकात पसरल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

कुणी केली आत्महत्या?

धुळे बस स्थानक एसटी बस चालकाच्या आत्महत्येनं हादरलं. पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातील कार्यरत असणारे हिरामण देवरे यांनी एसटी बसमध्येच आत्महत्या केली. त्यांनी एसटी बसमधील घंटी वाजवण्याच्या दोरीने स्वतःला बसमध्येच गळफास लावून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली. यानंतर एसटी बस स्थानकात एकच खळबळ उजाली. पुणे-धुळे बसमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

हे सुद्धा वाचा

कुटुंबीयांना धक्का

बसमध्ये चालकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचं निदर्शनास आल्यानंतर लगेचच याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. पुणे-धुळे बसने आत्महत्या केलेल्या चालकानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

हिरामण देवरे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. देवरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून हिरामण देवरेंच्या जाण्याने त्यांचे कुटुंबीय पोरके झालेत. नेमकी देवरे यांनी का आत्महत्या केली, याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.