17 जातींना घेताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?; मनोज जरांगे यांचे सरकारला दोन प्रश्न

मनोज जरांगे यांनी आज नारायण गडावर दसरा मेळावा साजरा केला. या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. बीडमध्ये प्रचंड उन्हाच्या तडाख्यात लोक या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आली होती.

17 जातींना घेताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?; मनोज जरांगे यांचे सरकारला दोन प्रश्न
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 2:18 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्या नारायण गडावर जोरदार भाषण केले आहे.त्यांनी आचारसंहिता लागायच्या आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.आमच्या ताटात येऊ नका ? असे वारंवार म्हटले जात आहे. आधीच भरपूर जाती असल्याचे म्हटले जात आहे. मग तुम्ही काल परवा मोठी सतरा जाती आरक्षणात घेतल्या तेव्हा तुम्हाला धक्का लागला नाही का ? असाही सवाल मनोज जरांगे यांची यावेळी केला.

मनोज जरांगे यांनी यावेळी भाषणात मराठ्यांना आरक्षणाची सर्वात जास्त गरज असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की आमची आरक्षणाची मागणी १४ महिन्यापासून आहे. परंतू एकही मागणी मान्य केली नाही. फक्त सांगताना सांगितलं, तुम्ही आमच्यात येऊ नका. तुम्ही आल्याने धक्का लागतोय. आमच्या ताटात खाऊ नका. आमच्या ताटात येऊ नका. आमच्या ताटात आल्याने आमचं संपतंय. तुम्ही आमच्यात मागणी करू नका. आधीच भरपूर आहेत. ४०० ते ४५० जाती आहेत. आमचं कमी होतंय. आता मला याचं उत्तर हवंय असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

  धक्का लागतो म्हणणारा कुठे आहे?

माझ्या समाजाला शब्द आणि उत्तर पाहिजे. तुम्ही काल परवा मोठ्या १७ जाती आरक्षणात घातल्या. आता तुम्हाला धक्का लागला नाही का?  धक्का लागतो म्हणणारा कुठे आहे. आमच्यात येऊ नका म्हणणारा कुठे आहे. हा काय द्वेष. इतका द्वेष मराठ्यांचा का. ओबीसींचा द्वेष का.?  तुम्हीच म्हटला गोरगरीब ओबीसींच्या आरक्षणात धक्का नको. मग १७ जाती टाकताना गोरगरीब ओबीसींचा विचार का केला नाही का असाही सवाल जरांगे यांनी यावेळी केला.  ते पुढे म्हणाले की  दुसरा प्रश्न, जेव्हा आम्ही आरक्षण मागितलं तेव्हा एकजण म्हणाला, तुम्हाला आरक्षण हवं असेल तर महाविकास आघाडीकडून लिहून घ्या. तरच आरक्षण देतो. तुम्ही १७ जाती घातल्या, तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का. मराठ्यांना गोरगरीब ओबींसींनी, मुस्लिम, दलितांना न्याय देताना एक न्याय द्यायचा, दुसऱ्यांना वेगळा न्याय. गडावरून जातीधर्मावर बोललं जाणार. पण जातीचा उल्लेख करणार नाही.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.