AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी बँकेच्या बैठकीत राडा प्रकरण, सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर, नेमकं काय म्हणाले?

बुधवारी एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली होती, समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल, यावर आता गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

एसटी बँकेच्या बैठकीत राडा प्रकरण, सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर, नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2025 | 4:13 PM
Share

बुधवारी एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली होती, समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली, या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली, या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. बैठक सुरू असताना अपमानास्पद भाषा वापरली तसेच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यानं ही हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे.

एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली, या बैठकीला गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचे सर्व संचालक आणि शिवसेना अडसूळ पॅनलचे देखील सर्व संचालकांची उपस्थिती होती. मात्र बैठक सुरू असतानाच हा वाद पेटला, वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. आमच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप सदावर्ते गटाच्या संचालकांकडून करण्यात आला आहे, बैठकीच्या ठिकाणी त्यानंतर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान यावर आजा ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सदावर्ते? 

काल लैंगिक शोषणापर्यंतची हिंमत काही जण दाखवत होते, काल भावनांचा उद्रेक झाला, लाडक्या बहिणींच्या सन्मानार्थ, त्यांच्या संरक्षणार्थ आम्ही पुढे आलो.  सर्व कायदेशीर बाबी समोर याव्या म्हणून आज आलो आहे.  मराठा समाजाच्या बहिणीला त्रास दिला गेला, तिला हे कॉल करत होते,  आम्ही आता नाव घेणार नाही, तीचं नाव खराब होता कामा नये. दुसरी बहीण वंजारी समाजाची आहे, तिला देखील अपशब्द वापरले, तिसरी बहीण कोण आहे तर ती आदीवासी समाजाची आहे, आता एफआयआर दाखल झाला आहे, एफआयआरमधील तथ्थ आहेत, ते अतिशय गंभीर आहेत. त्यांच्याविरोधातील जी कलम आहेत, त्या अंतर्गत त्यांना सात वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा देखील होऊ शकते, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. दरम्यान  संदीप काटकर, मनोज मुदलियार, दत्ता खेडकर, श्रीहरी काळे, राजेश पानपाटील, संध्याताई दहिफळे, अजित मगरे, अतुलजी सीताफराव ,  या सर्वांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.