Satara ZP elections : महाराज तिकीट द्या, नाहीतर दोरी द्या, उदयनराजे यांच्याकडे समर्थकाची अजब मागणी
कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणूका झाल्या. आणि सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका बऱ्यात वर्षांनी होत आहेत. त्यामुळे दिवसरात्र पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट हवे असते.यंदा महानगर पालिकांच्या निवडणूकात एबी फॉर्म पळवणे, ते फॉर्म गिळणे, कलर झेरॉक्स काढणे, माघार घेऊ नये म्हणून आपल्याच उमेदवाराला कोंडून ठेवणे असे अनेक चमत्कारिक प्रकार घडले होते. आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्या एका कार्यकर्त्याच्या तिकीटासाठीचे आवाहन करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.यामध्ये प्रत्येक उमेदवार आपल्याला पक्षाचे तिकीट कसे मिळेल याकडे लक्ष लावून बसले आहेत. खासदार उदयनराजे यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर हे सुद्धा मसूर जिल्हापरिषद गटा मधून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत.या आधी सुद्धा झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी उदयनराजेंची निवडणुकीची धुरा समर्थपणे सांभाळलेली आहे. याआधी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून कुलदीप शिरसागर हे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते. परंतु उदयनराजे यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उमेदवारी मागे घेतली.
त्यामुळे कुलदीप शिरसागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यांनी आपल्या उमेदवारीची मागणी उदयनराजे यांच्याकडे केली.यावेळी “आता उमेदवारी द्या नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या” अशी मागणी उदयनराजे यांच्याकडे कुलदीप क्षीरसागर यांनी केल्यानंतर उदयनराजेंना सुद्धा हसू आवरले नाही.सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
इच्छुकांच्या मुलाखती
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची मुलाखती आज सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यूव या ठिकाणी घेण्यात आल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशीलदादा कदम, आमदार सदाशिवभाऊ सपकाळ, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, वसंतराव मानकुमरे, मलकापूर नगराध्यक्ष तेजस सोनावणे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
3, 76,774 मतदारांची वाढ
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यात सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्याने सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी तसेच पंचायत समित्यांच्या 130 गटांसाठी होणाऱ्या या निवडणुकांमुळे गावातील राजकारण तापत आहे. प्रशासनानेही निवडणूक तयारी सुरु केली आहे. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 3, 76,774 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या 23 लाख 42,787 इतकी झाली आहे.
