डोंबिवली म्हणजे घाणेरडं शहर; नितीन गडकरींचं बोलणं मनाला झोंबल्यामुळे नगरसेवक लागला कामाला

डोंबिवलीत नियोजनाचा पत्ता नाही. या शहराच्या नियोजनाची वाट राजकीय मंडळींनी लावल्याचे त्यांनी म्हटले होते.| Nitin Gadkari

डोंबिवली म्हणजे घाणेरडं शहर; नितीन गडकरींचं बोलणं मनाला झोंबल्यामुळे नगरसेवक लागला कामाला
डोंबिवलीत नियोजनाचा पत्ता नाही. या शहराच्या नियोजनाची वाट राजकीय मंडळींनी लावल्याचे त्यांनी म्हटले होते.

डोंबिवली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मध्यंतरी डोंबिवलीला घाणेरडय़ा शहराची उपमा दिली होती. गडकरी यांचे हे वक्तव्य खोडून काढण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी स्वखर्चातून डोंबिवलीत शहराच्या भिंती सुशोभित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या भिंतींवर स्वच्छता आणि समाज प्रबोधनाचे संदेश लिहले जात आहेत. ही बाब नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे. (BJP leader Nitin Gadkari says Dombivli is ugly city)

दोन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवलीतील विद्यार्थ्यांशी वेबिनारद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी त्याठिकाणी शहरातील मान्यवर व्यक्तीही उपस्थित होत्या. या सगळ्यांदेखत नितीन गडकरी यांनी डोंबिवली सगळ्यात घाणेरडं शहर असल्याची परखड टिप्पणी केली होती. डोंबिवलीत नियोजनाचा पत्ता नाही. या शहराच्या नियोजनाची वाट राजकीय मंडळींनी लावल्याचे त्यांनी म्हटले होते.

गडकरींच्या या वक्तव्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वच्छ व सुंदर कल्याण डोंबिवली मोहीम हाती घेतली होती. तसेच महापालिकेकडून शून्य कचरा मोहीम सुरु आहे. तेव्हापासून शहरातील कचरा व्यवस्थितपणे डंपिंग ग्राऊंडवर जाण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतरी शहराच्या परिस्थितीत फारसा फरक पडला नव्हता.

शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा पुढाकार

डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी गडकरी यांनी केलेल्या वक्तव्य खोडून काढण्यासाठी स्वखर्चातून शहरातील भिंती रंगविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भिंतीवर समाज प्रबोधनात्मक आणि जनजागृतीपर संदेश दिला जात आहे. त्यामध्ये पाणी वाचवा, पर्यावरण रक्षणासाटी वृक्ष तोड टाळा, कचरा वर्गीकरण, लेक वाचवा, शिक्षण महत्वाचे आहे आदी विविध प्रकारचे संदेश रंगविलेल्या भिंतींवर चितारण्यात आलेले आहेत. म्हात्रे यांचे हे काम नागरीकांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून सगळ्य़ांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.

मुळा-मुठा प्रकल्प पूर्ण होणार

राज्यातील महत्वाच्या जलसिंचन प्रकल्पांवर दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या बैठकीला हजर होते.
या बैठकीत पुण्यातील मुळा-मुठा नदीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1200 कोटींचा हा प्रकल्प आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या:

जेव्हा महाराष्ट्राच्या प्रकल्पांसाठी गडकरी, जयंत पाटील आणि फडणवीस एक होतात!

गोसीखुर्दचा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणार? हा आहे गडकरी मार्ग

Video: नागपूरचा नाग आणि पुण्याच्या मुळा मुठा प्रकल्पाचं काय होणार? ऐका खुद्द गडकरी काय सांगतात

(BJP leader Nitin Gadkari says Dombivli is ugly city)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI