निर्बंध असतानाही भाविकांकडून देणगीचा ओघ, गेल्या दहा दिवसांमध्ये साई चरणी 6 कोटी 68 लाखांचे दान

निर्बंध असतानाही भाविकांकडून देणगीचा ओघ, गेल्या दहा दिवसांमध्ये साई चरणी 6 कोटी 68 लाखांचे दान

गेल्या दहा दिवसांमध्ये साईबाबा चरणी भक्तांकडून कोट्यावधीचे दान अर्पण करण्यात आले आहे. ज्यामध्ये सोन्या,चांदीचे दागीने, पैसे आणि अन्य किमती वस्तूंचा समावेश आहे. नाताळ आणि नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 04, 2022 | 6:28 PM

शिर्डी : गेल्या दहा दिवसांमध्ये साईबाबा चरणी भक्तांकडून कोट्यावधीचे धन अर्पण करण्यात आले आहे. ज्यामध्ये सोन्या,चांदीचे दागीने, पैसे आणि अन्य किमती वस्तूंचा समावेश आहे. नाताळ आणि नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. याच काळात लागून आलेल्या सुट्यांमुळे भाविकांनी साई दर्शनाचा बेत आखला. तसेच अनेक भाविक आपल्या नववर्षाची सुरुवात ही साई दर्शनाने करत असतात. त्यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये साई चरणी कोट्यावधी रुपयांचे दान भाविकांनी अपर्ण केले आहे.

26 लाखांचे सोने अपर्ण

गेल्या दहा दिवसांमध्ये साईबाबा देवस्थानाला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी 6 कोटी 68 लाखांचे दान दिले आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागीने, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. शिर्डी संस्थानकडून दानपेटीमध्ये आलेल्या पैशांची देखील मोजणी करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये साईबाबा चरणी 26 लाख 22 हजार रुपयांचे सोने तर एक लाख सात हजार रुपये किमतीची चांदी अर्पण करण्यात आली आहे. विशेष  म्हणजे या उत्पन्नामध्ये देणगी काऊंटरवर आलेलेल्या देणगीचा तसेच ऑनलाईन देणगीचा समावेश करण्यात आलेला नाही. याबाबत साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांनी माहिती दिली आहे.

निर्बंध असतानाही देणगीचा ओघ

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे सावट होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत साईबाबा मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद असल्याने देणगीचा ओघ अटला होता. मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच मंदिर सुरू केल्याने भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. पंरतु आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने साईबाबा संस्थांनाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच वेळेचे देखील बंधन आहे. असे असून देखील भाविक मोठ्या भक्तीभावाने साईचरणी देणगी अर्पण करत आहेत.

संबंधित बातम्या 

Omicron | ‘ओमिक्रॉन’चा हवाई क्षेत्राला फटका! इंडिगोची अनेक उड्डाणं रद्द, वाचा संपूर्ण यादी

ओमिक्रॉनची धास्ती, पण डेल्टाच जास्त जीवघेणा! आरोग्य मंत्रालयानं नेमकं काय सांगितलं?

Rajan Vichare | शिवसेना खासदार राजन विचारे यांना कोरोनाची लागण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें