ठाण्यासह मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजुरी, काम चालू करण्याचे धनंजय मुंडे यांचे आदेश 

त्वरीत निविदा प्रक्रिया करून काम चालू करण्याचे आदेश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. (DR. Babasaheb Ambedkar Cultural Center)

ठाण्यासह मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजुरी, काम चालू करण्याचे धनंजय मुंडे यांचे आदेश 
Dhananjay Munde
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 5:44 PM

मुंबई : ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी त्वरीत निविदा प्रक्रिया करून काम चालू करण्याचे आदेश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. (DR. Babasaheb Ambedkar Cultural Center In Thane Mira Bhayander)

ठाणे महानगरपालिका हद्दीतील आनंद नगर येथील महानगरपालिकेच्या सुविधा भुखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 9 कोटी 75 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 90 टक्के राज्य शासनाचा निधी उपलब्ध होणार आहे. यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून 10 टक्के निधी दिला जाणार आहे.

ही संपूर्ण वास्तू पूर्ण झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात राहणार आहे. त्याची निगा आणि देखभाल ठाणे महानगरपालिका करणार आहे. या केंद्रासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी ही दिलेली आहे.

मिरा भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजुरी 

अशाच पध्दतीने मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रातील महसूल खात्याची जमीन सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्याठिकाणी 13 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 90 टक्के राज्य शासन आणि 10 टक्के खर्च हा मिरा-भाइर्दर महानगरपालिका करणार आहे. त्यांचीही निगा आणि देखभाल सदरची वास्तू पुर्ण झाल्यानंतर मिरा-भाइर्दर महानगरपालिकेकडे सोपविण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे. तसेच मिरा-भाइर्दर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ही मंजुरी ही दिलेली आहे.

दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेल्या ठाणे आणि मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आंबेडकर अनुयायांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये या केंद्राची निर्मिती व्हावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे होत होती. तसेच या वास्तूमध्ये विपश्यना केंद्र, लायब्ररी आणि राहण्याची व्यवस्था होत आहे. त्यामुळे परगावाहून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना त्याचा फायदा होणार आहे. या दोन्हीं प्रस्तावाना मंजुरी देत असताना गरज पडल्यास या केंद्रांसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्र्यांनी दिली.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला राज्य शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले. (DR. Babasaheb Ambedkar Cultural Center In Thane Mira Bhayander)

संबंधित बातम्या : 

कुत्र्यांच्या तावडीतून शेकरुला सोडवलं, पण वनकर्मचाऱ्यालाच चावला, हात केला रक्तबंबाळ

औरंगाबादेत नव्या छाव्यांना संधी, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची जुळवाजुळव

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.