डॉ. आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी पालकमंत्री, विभागीय आयुक्तांकडून अभिवादन; नाशिकमध्ये ठिकठिकाणी विचारांचे स्मरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची अंमलबजावणी करून त्यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचे संरक्षण आपण सर्वांनी करूया, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

डॉ. आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी पालकमंत्री, विभागीय आयुक्तांकडून अभिवादन; नाशिकमध्ये ठिकठिकाणी विचारांचे स्मरण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्री छगन भुजबळ यांनी महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केले.

नाशिकः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यावेळेस माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

राज्यघटनेचे संरक्षण करू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच दिला. त्यांचे हे विचार देशाला एकसंघ ठेवण्यास आणि समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची अंमलबजावणी करून त्यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचे संरक्षण आपण सर्वांनी करूया, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

महसूल विभागात अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील सेवा हमी हक्क विभागाचे आयुक्त चित्रा कुलकर्णी, अपर आयुक्त भानुदास पालवे, महसूल प्रबोधनीच्या संचालक गीतांजली बाविस्कर, उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त (रोहयो) डॉ. अर्जुन चिखले, उपायुक्त (नियोजन) प्रदीप पोतदार व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ठिकठिकाणी स्मरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नाशिक शहरात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकमध्ये अनेक दिवस वास्तव्य केले होते. नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथूनच धर्मांतराची घोषणा केली. येवल्यात ज्या ठिकाणी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली त्या जागेवर भव्य मुक्तपीठ उभारण्यात आले आहे.

देशाला दिशा दिली

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आजच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण केले. आंबेडकरांनी देशाला फक्त घटना नाही, तर देशाला दिशा देण्याचे काम केले. शाहू, फुले, आंबेडकरांनी विज्ञानावर आधारित समाजकारण केले. त्या सूत्रावरचे काम आता मराठा विद्या प्रसारक शिक्षण मंडळाने केले. सत्ता येते आणि सत्ता जाते. याची चिंता करायची नसते फक्त सामाजिक बांधिलकी ठेवायची असते, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

इतर बातम्याः

Raj Thackeray | राज ठाकरेंचा नाशिक दौरा पुढे ढकलला; महाराष्ट्र दौऱ्याचा नारळ पुण्यातून फुटणार, 15 डिसेंबरला MNS चा मेळावा

Narayan Rane| मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का; नारायण राणे यांनी खोचक टोल्यातून डिवचले!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI