Maha SSC HSC Exam : विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : शिक्षणमंत्री

Maha SSC HSC Exam : विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन  इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं वर्षा गायवाड यांनी सांगितलंय. (ssc and hsc exam)

prajwal dhage

|

Apr 09, 2021 | 6:49 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यात उद्योगधंदे, व्यापार यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या राज्यातील वेगवेगळ्या परीक्षांवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे या काळात परीक्षांचे आयोजन करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आगामी काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन  इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं वर्षा गायवाड यांनी सांगितलंय. (due to Corona within five days state government will take best decision on HSC and SSC exam)

 

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या ?

मागील काही दिवसांपासून आपण संवाद करत आहोत. सध्या कोरोना वाढल्यामुळे विद्यार्थी तणावात आहेत. या परिस्थितमध्या विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यावी असा प्रश्न विद्यार्थ्यांना आहे. या प्रश्नावर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून विविध लोकांशी चर्चा करण्यात आली. यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांच्याशी या काळात बोलणं झालं. विद्यार्थ्यांचं आरोग्य हीच विद्यार्थ्यांची प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये या दृष्टीकोनातून आम्ही विचार करत आहोत. येणाऱ्या काही दिवसांत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर येणाऱ्या काही दिवसांत मी पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

एमपीएससीच्या परीक्षांचा पुढे ढकलल्या, 10 वी 12 चं काय ?

दरम्यान, राज्य सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून रविवारी 11 एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. याच संदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केल्याचं ट्विट केलं होतं.

आदित्य ठाकरे यांचं ट्विट 

यामध्ये ट्विटमध्ये त्यांनी 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेसंदर्भात आणि कोरोनासंदर्भात मेसेज येत आहेत, असं म्हटलं होतं. तसेच “मी विद्यार्थ्यांच्या या समस्यांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा ही पहिली प्राथमिकता असेल, असं सांगितलं आहे. वर्षा गायकवाड सध्या बोर्डाशी संबंधित अधिकारी आणि तज्ञांशी सविस्तर चर्चा करत आहेत. विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये,” असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या भविष्यातील करिअर संकटात येईल, असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. त्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, असंसुद्धा आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, वर्षा गायकवाड आगमी काही दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन अयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत योग्य निर्णय घेणार आहेत. हा निर्णय काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

NEP 2020: केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून सार्थक योजनेचे उद्घाटन, नवीन शिक्षण धोरण राबवण्यामध्ये राज्यांसाठी फायदेशीर ठरणार

प्रियांका गांधींनी सीबीएसईला फटकारलं, कोरोना रुग्ण वाढताना परीक्षा घेणं बेजबाबदारपणा असल्याचं सुनावलं

MPSC च्या परीक्षेचा निर्णय झाला, ठाकरे सरकार दहावी बारावीचं काय करणार?

(due to Corona within five days state government will take best decision on HSC and SSC exam)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें