AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Fire Crackers | फटाके फोडताना जरा जपून, राज्यात किती मोठं नुकसान झालय ते एकदा वाचा

Diwali Fire Crackers | राज्यात दिवाळी सणाचा उत्साह आहे. पण त्याचवेळी फटाक्यांमुळे विविध शहरात आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. फटाक्यांमुळे आग लागून सर्वसामान्यांच मोठ आर्थिक नुकसान झालाय. राज्यात फटाक्यांमुळे किती ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. किती नुकसान झालय, त्यावर एकदा नजर मारा.

Diwali Fire Crackers | फटाके फोडताना जरा जपून, राज्यात किती मोठं नुकसान झालय ते एकदा वाचा
Fire from fire crackers
| Updated on: Nov 13, 2023 | 8:29 AM
Share

मुंबई : राज्यात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना काही ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. काल लक्ष्मीपूजन होतं. राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. फटाके फोडण्यासाठी घालून दिलेल्या वेळ मर्यादेच सर्रास उल्लंघन करण्यात आलं. दरम्यान राज्याच्या वेगवेगळ्या भागात आग लागण्याच्या घटना घडल्या. भिवंडीत आगीचे सत्र सुरू असून भिवंडी शहरातील मार्केट परिसरात मिराकल मॉलच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक दुकानात मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की, या आगीमुळे इलेक्ट्रिक दुकानासहीत युनानी दवाखाना, कपड्याचे दुकान अशी चार दुकानं आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळतात स्थानिकांनी तात्काळ इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या व तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु तोपर्यंत या आगीत चार दुकानं जळून खाक झाली होती. आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

नाशिकच्या मेनरोड रेड क्रॉस सिग्नल परिसरात असलेल्या वर्धमान या कपड्याच्या शोरुमला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे 10 हून अधिक बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आली. पण आत्ता पर्यंतलागून असलेली 3 हून अधिक दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली. येवल्यातील नाकोडा फॅशन ड्रेसेस दुकानाला भीषण आग. आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक. शर्थीचे प्रयत्न करुन अग्निशामक दलाने ही आग विझवली. आग भीषण असल्याने स्थानिक नागरिकांची ही आग विझवण्यासाठी मदत केली. आगीचे कारण अस्पष्ट आहे. फटाक्याच्या आतिषबाजीमुळे आग लागल्याची जोरदार चर्चा.

पुण्यात किती आगीच्या घटना?

पुण्याच्या भोर तालुक्यातील नऱ्हे गावातील शेतकरी शिवाजी राजाराम गोळे यांच्या घराला शॉट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घटली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमध्ये घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक. माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. ऐन दिवाळीत घराला आग लागून झालेल्या नुकसानीमुळे गोळे कुटुंब आर्थिक संकटात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी सात ते राञी दहा या वेळेत अग्निशमन दल नियंत्रण कक्षात फटाक्यांमुळे 15 आगीच्या घटनांची नोंद. यामध्ये शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर वाड्यामधे आगीची घटना मोठी. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. जखमी किंवा जिवितहानी नाही.

विरारमध्ये कुठे घडली आगीची घटना?

फटाक्यांमुळे विरारच्या मनवेलपाडा तलावाजवळ कापडी प्लास्टिकच्या दुकानाला आज मध्यरात्री 12.15 च्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झालं आहे. स्थानिक नागरिकांनी काही वेळात आग विझविण्यात यश मिळविले आहे यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग लागली त्यापासून काही अंतरावर फटाक्याची दुकानं होती. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टाळली आहे. आज लक्ष्मीपूजन असल्याने सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. त्यातील एक फटाका दुकानात शिरल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

विरारमध्येच विवा धावलगिरी कॉम्प्लेक्समध्ये एका रूमला भीषण आग लागली आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र घराचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग फटाक्यांमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

बुलढाण्यात आग

बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर येथील कापड दुकानाला आग. आगीचे कारण अद्याप आस्पष्ट. लाखो रुपयांचे नुकसान. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आग.

सोलापुरात हॉटेलला आग

सोलापूरच्या बार्शी शहरातील राजवाडा हॉटेलला भीषण आग लागली. शिवाजी कॉलेज परिसरात असलेले राजवाडा हॉटेल आगीत जळून खाक झाले. अचानक हॉटेलला आग लागल्याने ग्राहकांची पळापळ. हॉटेलला लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. आगीमध्ये कुठलीही जीवित हानी नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात. अग्निशमन दलाने तीन बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवलं.

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.