Maharashtra News Live | अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा, प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

| Updated on: Nov 13, 2023 | 9:37 PM

Maharashtra Mumbai Marathi News Live : आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra News Live | अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा, प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह आहे. काल देशभरात नागरिकांनी लक्ष्मीपूजनासह परस्परांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीत वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. ते कमी करण्यासाठी फटाके फोडण्याच्या वेळेवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. फटाके फोडू नये म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. पण दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले. राजधानी दिल्ली, मुंबई या मेट्रो शहरात हवेची गुणवत्ता घसरली आहे. त्यामुळे काही गोष्टींवर बंदी आहे. दिवाळीत जे फटाके फोडण्यात आले, त्यामुळे वायू प्रदूषणात किती वाढ झाली? ते आकडे अजून समोर आलेले नाहीत. दुसऱ्याबाजूला फटाक्यांमुळे काही ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. दरम्यान राज्यातील राजकीय नेत्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पण परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका कायम ठेवली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Nov 2023 07:34 PM (IST)

    वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मॅचच्या तिकीट वाटपात काळाबाजार, एकाला अटक

    मुंबई | क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामन्यांसाठी तिकीटांचा काळाबाजार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आकाश कोठारी नावाच्या तरुणाला जे जे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. क्रिकेट वर्ल्ड कप सेमी फायनल सामन्यांची तिकीट दुप्पट -तिप्पट किंमतीत विकली जात असल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या बाल्कनीमधील तिकिट आरोपीने चढ्या भावात विकल्याचा संशय आहे. आरोपीने तब्बल सव्वालाख किमतीपर्यंत तिकीट विकली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

  • 13 Nov 2023 07:21 PM (IST)

    अजित पवार गटाचे आमदार शरद पवरांना भेटायला जाणार नाहीत

    पुणे | अजित पवार गटातील आमदार उद्या शरद पवारांना भेटायला बारामतीत जाणार नाहीत. दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार आणि पवार कुटुंबीय उद्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असतात. दरवर्षी होणाऱ्या पाडव्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी जात असायचे.  मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे.  बारामतीतल्या गोविंदबागेत शरद पवार उद्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतील

  • 13 Nov 2023 06:28 PM (IST)

    राज्य कला प्रदर्शनाचं मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजन

    मुंबई | राज्य कला प्रदर्शनाचं आयोजन हे मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी इथे करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं आयोजन हे 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे.या प्रदर्शनासाठी रेखा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी कलावंतांकडून ऑनलाईन स्वरूपात कलाकृती सादर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

  • 13 Nov 2023 06:21 PM (IST)

    Prafull Patel On Ajit Pawar | अजित पवार नाराज नाहीत : प्रफुल्ल पटेल

    मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज नाहीत, असं खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली, कुठल्याही नाराजीचा विषय नाही, असंही पटेल यांनी सांगितलं. काही लोकांना पोटदुखी आहे, त्यामुळे ते तशी बातमी पसरवत आहेत, असंही पटेल म्हणाले.

  • 13 Nov 2023 05:55 PM (IST)

    राजस्थान विधानसभा निवडणुकीची कमान पंतप्रधान मोदींकडे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता राजस्थान विधानसभा निवडणुकीची धुरा सांभाळली आहे.पीएम मोदींचा राजस्थानमध्ये मॅरेथॉन दौरा होणार आहे. ते पश्चिम ते पूर्व राजस्थानपर्यंत जाहीर सभा घेणार आहेत. मतदानाच्या 10 दिवस आधी पंतप्रधानांचे 6 हून अधिक दौरे प्रस्तावित आहेत. मतदानाच्या 2 दिवस आधी जयपूर आणि जोधपूरमध्ये पंतप्रधानांचा मोठा रोड शोही होणार आहे.

  • 13 Nov 2023 05:45 PM (IST)

    उपांत्य फेरीसाठी भारतीय संघ मुंबईत पोहोचला

    आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत भारतीय क्रिकेट संघ मुंबई विमानतळावर पोहोचला. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 15 नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे.

  • 13 Nov 2023 05:35 PM (IST)

    नेपाळमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानाला आग, 28 जण जखमी

    पूर्व नेपाळमधील विराटनगर येथील सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत चार पोलिसांसह 28 जण जखमी झाले आहेत. विराटनगरमधील उरलाबारी भागात असलेल्या दुकानात रविवारी रात्री दुकानात काम करणारे लोक लक्ष्मीपूजन करत असताना ही आग लागली. सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात ठेवलेल्या एलपीजी सिलिंडरमधून गॅसची गळती झाल्याने ही आग लागली.

  • 13 Nov 2023 05:20 PM (IST)

    छत्तीसगडमध्येही ‘गृहलक्ष्मी योजना’ लागू करणार – प्रियंका गांधी

    छत्तीसगडमध्येही ‘गृहलक्ष्मी योजना’ लागू करण्यात येणार आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे की, महिलांच्या खात्यावर दरवर्षी 15 हजार रुपये पाठवले जातील. यासोबतच प्रत्येक सिलिंडर रिफिलवर 500 रुपये सबसिडी दिली जाईल आणि बचत गट आणि सक्षम योजनेचे कर्ज माफ केले जाईल.

  • 13 Nov 2023 05:04 PM (IST)

    भारतानंतर नेपाळमध्येही टिकटॉकवर बंदी घालण्यात येणार

    नेपाळ सरकारने TikTok या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेपाळ सरकारने टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळ सरकारच्या कम्युनिकेशन मंत्री रेखा शर्मा यांनी टिकटॉकवर लवकरच बंदी घातली जाईल, असे म्हटले आहे.

  • 13 Nov 2023 03:58 PM (IST)

    कालच्या आगीच्या घटनांमुळे अग्निशामक दलाने दिला सावधानतेचा इशारा

    पुणे शहरात काल लक्ष्मीपूजनानंतर जवळपास २५ हून अधिक आगीच्या घटना घडलेला आहेत आणि या सर्व घटना फटाक्यांमुळे घडल्याची माहिती पुण्याच्या अग्निशामक दलाच्या प्रमुखांनी दिलेले आहे. त्यामुळे इथून पुढे दोन दिवस फटाके वाजवताना पुणेकर आणि नेमकी काय काळजी घ्यावी याबाबतचा अहवाल देखील त्यांनी केलेला आहे

  • 13 Nov 2023 03:45 PM (IST)

    ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ

    ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आलीये. ललित पाटीलाला २० तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे सुट्टीच्या कोर्टाचे आदेश. मोक्काच्या कारवाईनंतर आता तब्बल २२ दिवसांपर्यंत ललित पाटील राहणार पोलिसांच्या तावडीत.

  • 13 Nov 2023 03:37 PM (IST)

    शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या बैठकीला शरद पवार राहणार उपस्थित

    शिवनगर विद्या प्रसारक मंडळाची आज वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडणार आहे. अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक. वार्षिक सर्वसाधारण बैठकीला शरद पवार उपस्थित राहतात. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विश्वस्त पण बैठकीला उपस्थित असणार

  • 13 Nov 2023 03:21 PM (IST)

    अजित पवार समर्थकांनी लावला गोविंद बाग परिसरात बॅनर

    अजित पवार समर्थकांनी थेट गोविंद बाग परिसरात बॅनर लावला आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार पाठीशी उभे राहतील ही खात्री. बारामतीकरांना खात्री आहे अशा आशयाचा बैनर लावण्यात आलाय. याची चर्चा आता सगळ्या बारामतीत रंगली आहे

  • 13 Nov 2023 03:06 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटीलांचा आमरण उपोषणाचा इशारा 

    सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटीलांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटीलांचा आमरण उपोषणाचा इशारा. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करणार आमरण उपोषण

  • 13 Nov 2023 02:55 PM (IST)

    मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आत्महत्याग्रस्त तरूणाच्या कुटुंबियांना शिधा वाटप

    आत्महत्याग्रस्तछत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांता मोर्चाच्या वतीने आत्महत्याग्रस्त तरूणाच्या कुटुंबियांना शिधा वाटप केलं आहे.

  • 13 Nov 2023 02:45 PM (IST)

    मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतलं आरक्षण हवंय- मनोज जरांगे पाटील

    कुणाची मागणी बरोबर आहे ते समाजाला माहित आहे. मला त्यावर काही उत्तर द्यायचं नसून ७० वर्षे मराठ्यांच्या लेकरांचं खाल्लं, मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतलं आरक्षण हवंय- मनोज जरांगे पाटील

  • 13 Nov 2023 02:41 PM (IST)

    सरकार आमच्याविरोधात खोटे गुन्हा दाखल केले जात आहेत- मनोज जरांगे पाटील

    सरकार आमच्याविरोधात खोटे गुन्हा दाखल केले जात आहेत. आम्ही स्वत:ला नेतृत्व मानत नाहीत. राजकीय पोळी भाजण्यासाठी वातावरण दुषित करण्याचा डाव- मनोज जरांगे पाटील

  • 13 Nov 2023 02:34 PM (IST)

    मराठा समन्वयक दिलीप पाटील यांची जरागेंच्या विरोधात भूमिका

    जरांगे यांनी १० टक्के आरक्षणाची मागणी करून सरकारला सोपा पेपर दिला. विद्वानांचा सल्ला घ्यावा कारण ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांनी काय करायचं, असा सवाल दिलीप पाटील यांनी केलाय.

  • 13 Nov 2023 02:29 PM (IST)

    वास्तू मंदिर आहे की मस्जिद हा वाद कोर्टात प्रलंबित

    अहमदनगरच्या गुहा गावात तणावाचं वातावरण आहे. पूजेवरून दोन गटात तुफान राडा झाला आहे. वास्तू मंदिर आहे की मस्जिद हा वाद कोर्टात प्रलंबित आहे.

  • 13 Nov 2023 02:15 PM (IST)

    कल्याण पश्चिमेत व्यापारीला मारहाण करत लुटपाट

    सीसीटीव्हीच्या मदतीने बाजारपेठ पोलिसांनी दोन सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या. चांद शेख आणि निहाल शेख असे या दोघांची नावे असून नशेसाठी लोकांना मारहाण करत लुटपाट करायचे.

  • 13 Nov 2023 01:55 PM (IST)

    पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्र अग्रेसर

    पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपली बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे आहे, त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित केले आहे.

  • 13 Nov 2023 01:45 PM (IST)

    कल्याणमध्ये व्यापारीला मारहाण करत लुटले

    कल्याण पश्चिमेत व्यापारीला मारहाण करत लुटमार केल्याचा प्रकार घडला. सीसीटीव्हीच्या मदतीने बाजारपेठ पोलिसांनी दोन सराईत आरोपीला बेड्या ठोकल्यात.  चांद शेख व निहाल शेख असे या दोघांची नावे असून नशेसाठी लोकांना मारहाण करत ते लुटमार करायचे असे समोर आलेय.

  • 13 Nov 2023 01:33 PM (IST)

    मंत्रिमंडळात अनेक मतभेद – जयंत पाटील

    मंत्रिमंडळात अनेक मतभेद आहेत. निधीवाटप, आरक्षण, विकासकामं घेण्यावरून सरकारमध्ये मतभेद आहे. हे सगळे मुद्दे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मात्र राज्याच्या विकासाच्या या गोष्टी मागे राहिल्यात, असे जयंत पाटील म्हणाले.

  • 13 Nov 2023 01:31 PM (IST)

    रूग्णांना केल्या जाणाऱ्या मदतीची सध्या जाहिरातबाजी सुरू – जयंत पाटील

    सध्या राज्यात रूग्णांना केल्या जाणाऱ्या मदतीची जाहिरातबाजी सुरू आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी कधी अशी जाहिरातबाजी केली नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

  • 13 Nov 2023 01:28 PM (IST)

    निधीवरून नाराजी हा अजितदादा गटाचा अंतर्गत विषय – जयंत पाटील

    निधीवरून नाराजी हा अजित पवार गटाचा अंतर्गत विषय असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

  • 13 Nov 2023 01:25 PM (IST)

    सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

    बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुर तालुक्यातील बोरी गावाला भेट देत खासदार सुप्रिया सुळे यांनी गावकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सद्य परिस्थिती अत्यंत भयानक असून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दैनंदिन जीवन जगणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी खासदार सुळे यांनी यावेळी केली आहे.

  • 13 Nov 2023 01:22 PM (IST)

    शरद पवार यांचं ते व्हायरल होणारं सर्टिफिकेश चुकीचं – जयंत पाटील

    शरद पवार यांचं व्हायरल होणारं प्रमाणपत्र चुकीचं आहे. शरद पवार यांनी बदनाम करण्यासाठी आणि नामदेव जाधव हे स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकांमध्ये शरद पवार यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

  • 13 Nov 2023 01:12 PM (IST)

    फटाके फोडल्यामुळे सिनेमागृहाचे नुकसान

    मालेगाव : फटाके फोडल्यामुळे सिनेमा गृहाचे नुकसान झाले आहे.  मोहम सिनेमा गृहाच्या मालकाने गुन्हा दाखल केला आहे. मालेगाव सिनेमागृहात फटाके फोडण्याच्या प्रकरणांत आरोपींवर कलम ११२ नुसार गुन्हा दाखल झालाय मालेगावच्या छावणी पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात प्रेक्षकांवर कलम ११२ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून २ जणांना ताब्यात घेतले आहे, या घटनेनंतर मालेगाव पोलीस पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे.

  • 13 Nov 2023 12:44 PM (IST)

    महाविकास आघाडीला जनतेने स्विकारले आहे- उदय सामंत

    हल्लीची पद्धत अशी आहे चांगलं झालं की माझ्यामुळे आणि वाईट झालं की ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित दादा यांच्यामुळे. ही फॅशन झालीय. उदय सामंत यांचा विरोधकांना टोला. रामदास गजानन कीर्तिकर मोठे नेते. निधी वाटपाबाबत काही नाराज नाही. महाविकास आघाडीला जनतेने स्विकारले आहे- उदय सामंत

  • 13 Nov 2023 12:29 PM (IST)

    विकासनिधीवरून महायुतीमध्ये नाराजीनाट्य.

    अजित पवार गट शिंदे गटावर नाराज असल्याच्या चर्चा. विकासनिधीत समानता नाही, दादा गटाचा आरोप. 21 नोव्हेंबरला होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता. विकासनिधीवरून महायुतीमध्ये नाराजीनाट्य.

  • 13 Nov 2023 12:18 PM (IST)

    मी उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिला उद्योग- उदय सामंत

    रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1500 कोटीचा कोको कोला उद्योग. मी उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिला उद्योग. उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्घाटनाला येण्याची शक्यता. मुख्यमंत्री येणार म्हणून रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात. वर्षभरामध्ये अनेक कंपन्या कोकणामध्ये उद्योगासाठी आलेल्या असतील- उदय सामंत

  • 13 Nov 2023 11:51 AM (IST)

    बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानचंही नाव एफआयआरमध्ये

    बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानचंही नाव एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी महादेव बुक ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी या 31 जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. आता या प्रकरणाची एफआयआर प्रत बाहेर आल्याने एकेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खानचंही नाव आहे. आरोपी क्रमांक 26 म्हणून साहिल खानचं नाव आहे.

  • 13 Nov 2023 11:32 AM (IST)

    आग्रा इथल्या होम स्टे हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार

    आग्रा इथल्या होम स्टे हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. 25 वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारीत महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपींमध्ये तरुणीच्या मित्राचाही समावेश आहे. विरोध केल्यानंतर तरुणीला मारहाण करण्यात आली.

  • 13 Nov 2023 11:11 AM (IST)

    कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटण्याची चिन्हे

    कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. टाकळवाडी याठिकाणी गुरू दत्त साखर कारखान्याची तोड बंद पाडण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. पोलीस बंदोबस्तात ऊस तोडायचा प्रयत्न केल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाले आहेत.

  • 13 Nov 2023 10:42 AM (IST)

    भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडून आमदार रोहित पवारांना पुन्हा एकदा धक्का

    भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडून आमदार रोहित पवारांना पुन्हा एकदा धक्का. जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड यांनी भाजपात प्रवेश केला. सरपंच सुभाष आव्हाड यांनी सदस्यांसह राम शिंदे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. तसेच युवा नेते प्रशांत शिंदे यांनी देखील भाजपात प्रवेश केला.

  • 13 Nov 2023 10:36 AM (IST)

    पुण्याला वायू प्रदूषणाचा मोठा विळखा

    पुणे शहरात दोन आठवड्यांपासून हवेची गुणवत्ता ढासळली असतानाच, रविवारी त्यात फटाक्यांच्या धुराची भर पडली. लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी शिवाजीनगर परिसरातील हवेची गुणवत्ता अतिवाईट, तर कोथरूड, पिंपरीमधील भूमकर चौक, निगडी, भोसरीमध्ये हवेचा दर्जा वाईट नोंदविण्यात आला.

    आसमंतामध्ये फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच धुराचे लोटही पाहायला मिळाले. आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीने नागरिकांनी फॅन्सी, रोषणाईचे फटाके वाजविल्याने हवा प्रदूषण वाढले आहे.

  • 13 Nov 2023 10:12 AM (IST)

    नाशिकमध्ये कपड्याच्या शोरूमला आग, लाखोंचं सामान जळून खाक

    नाशिकच्या मेनरोड रेड क्रॉस सिग्नल परिसरात असलेल्या वर्धमान या कपड्याच्या शोरुमला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 30 हून अधिक बंबाच्या मदतीने आग विझवली. फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती समोर आली असून लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले.

  • 13 Nov 2023 09:54 AM (IST)

    दिवाळीनंतर राजधानी दिल्ली पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

    दिवाळीनंतर राजधानी दिल्ली पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. दिल्लीकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने प्रदूषण पुन्हा वाढले. सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलून फटाके फोडल्यानं मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं आहे.

    आनंद विहार परिसरात एअर क्वालिटी इंडेक्स 969 वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी दिवाळीनंतर राजधानी दिल्लीतील AQI 312 होता मात्र यंदा AQI 370 वर पोहोचला आहे.

  • 13 Nov 2023 09:38 AM (IST)

    भाजपकडून आश्वासनं पूर्ण होत नाहीत – रोहित पवार

    भाजपकडून दिलेली आश्वासनं पूर्ण होत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला. लोकसभेपुरते नाराज आमदारांना वापरतील, सुरूवातीला नेत्यांना, लोकांना आमिष दाखवायचं, पण खरी वेळ आल्यावर काहीच करायचं नाही, अशीच वागणूक भाजप पक्ष देतो, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

  • 13 Nov 2023 09:25 AM (IST)

    कराड उंब्रज पाली मार्गावर पोलिसांची मोठी कारवाई, 6 तलवारी जप्त

    कराड उंब्रज पाली मार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई करत 6 तलवारी जप्त केल्या. उंब्रज पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने संशयित आरोपीला अटक केली. अधिक तपास सुरू.

  • 13 Nov 2023 09:18 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत लवकरच नाफेडकडून कांदा विक्री केंद्र सुरू होणार

    कल्याण-डोंबिवलीत लवकरच नाफेडकडून कांदा विक्री केंद्रं सुरू होणार. मोबाइल व्हॅनद्वारे एक ते दोन किलोच्या पॅकिंगमध्ये २५ रुपये किलो दराने कांदा दिला जाणार. सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून लवकरचं विक्री केंद्रं सुरू होणार.

  • 13 Nov 2023 09:06 AM (IST)

    फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईत वाढलं प्रदूषण

    मुंबईतील हवेची गुणवत्ता आधीच घसरलेली असताना फटाके फोडण्यासाठी हायकोर्टाने दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केलं जात आहे. फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईत आणखी मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्याचे दिसून आले. या धुरक्यामुळे मुंबईतल्या अनेक मोठ्या इमारती स्पष्ट दिसत नाहीत.

  • 13 Nov 2023 08:56 AM (IST)

    Live Update : गोविंड बागेत उद्या दिवाळी पाडव्यानिमित्त होणार गर्दी

    गोविंड बागेत उद्या दिवाळी पाडव्यानिमित्त होणार गर्दी… त्या पर्श्वभूमीवर पुणे ग्रामीण बीडीएस पथकाकडून गोविंद बागेची तपासणी… रिद्धि या श्वानाने केली तपासणी… उद्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी

  • 13 Nov 2023 08:38 AM (IST)

    Live Update : कांद्याचे दर वाढल्यामुळे नाफेडकडून कांदा विक्री केंद्र सुरु

    कांद्याचे दर वाढल्यामुळे नाफेडकडून कांदा विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण याठिकाणा नाफेडकडून कांदा विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. 25 रुपये दराने कांदा विकला जात असल्याने नागरिकांना दिलासा…

  • 13 Nov 2023 08:18 AM (IST)

    Live Update : पिंपरी चिंचवड शहरात यंदा दिवाळी उत्साहात साजरी

    पिंपरी चिंचवड शहरात यंदा दिवाळी उत्साहात साजरी झाली आहे. बाजारात यंदाच्या दिवाळीत 800 कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती समोर येत आहे. सोने, वाहने, कपडे, रियल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे. सराफा बाजारात 90 ते 100 कोटींची उलाढाल तर दिवाळीच्या मुहूर्तावर बांधकाम व्यावसायात 500 हुन अधिक घरांची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 13 Nov 2023 08:07 AM (IST)

    Live Update : जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा

    अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा आहे. आज सोमवती यात्रेनिमित्त हजारो भाविक जेजुरीमध्ये दाखल झाले आहेत.

  • 13 Nov 2023 08:00 AM (IST)

    Virat Fire | दुकान आगीत जळून खाक

    फटाक्यांमुळे विरारच्या मनवेलपाडा तलावाजवळ कापडी प्लास्टिकच्या दुकानाला आज मध्यरात्री 12.15 सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांनी काही वेळात आग विझवण्यात यश मिळवले आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

  • 13 Nov 2023 07:59 AM (IST)

    Pune news | यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमला

    सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गड सजला. जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमला. जेजुरी गडावर भंडाऱ्याची मोठी उधळण. खंडेरायायाच्या मानाच्या पालखीचं गड उतरून कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान. सोमवती अमावस्ये निम्मित जेजुरी गड भक्तांनी फुलला. नगर प्रदिक्षणा करत देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी जाणार. दुपारच्या सुमारास करण नदीवर देवाचं मानाच स्नान पार पडणार. खंडेरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविक जेजुरी गडावर. जेजुरी गडाला सोन्याचं रूप.

  • 13 Nov 2023 07:38 AM (IST)

    Rohit pawar | शरद पवार यांचे जातीचे प्रमाणपत्र व्हायरल

    शरद पवार यांचे जातीचे प्रमाणपत्र व्हायरल झालय. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “खोटे प्रमाणपत्र आहे. राजकीय विरोधक त्यात बदल करून व्हायरल करत आहेत. महाराष्ट्रात वेगळी प्रथा चालू करत आहात. सत्य गोष्ट कधीही बदलू शकत नाही. भाजपचे सोशल मिडियाचे कार्यकर्ते यांना सत्य पचत नाही. सत्याचे विचार भाजपला कधीही पटत नाही” अशी टीका रोहित पवार यांनी केली.

  • 13 Nov 2023 07:34 AM (IST)

    Congress News | काँग्रेस नेते राहुल गांधी आज मध्यप्रदेश दौऱ्यावर

    मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक. काँग्रेस नेते राहुल गांधी आज मध्यप्रदेश दौऱ्यावर. भोपाळ मध्ये राहुल गांधी यांचा रोड शो. उत्तर भोपाळ आणि मध्य भोपाळ विधानसभा मतदारसंघासाठी प्रचार सभा. मध्यप्रदेश विधानसभेसाठी 17 नोव्हेंबरला होणार आहे मतदान. सत्ताधारी भाजप पक्षावर आज राहुल गांधी जोरदार टीका करण्याची शक्यता

Published On - Nov 13,2023 7:32 AM

Follow us
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.